Breaking News

Tag Archives: tribal

उद्योगमंत्री उदय सामंत यांची स्पष्टोक्ती,… भूमिपुत्रांना रोजगार देणे बंधनकारक राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस प्रोत्साहन निधी देणार

गुजरातमधील वस्रोद्योग महाराष्ट्रातील नवापूरमध्ये गुंतवणूक करत आहेत, राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्रद्योगांना भरघोस प्रोत्साहन निधी (इन्सेन्टिव्ह) दिला जाणार असून, यासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासी भूमीपुत्रांना या उद्योगांनी रोजगार देणे बंधनकारक असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. जनरल पॉलिफिल्म लिमिटेड कंपनीच्या सुमारे ८०० कोटी रूपये गुंतवणूकीच्या प्रकल्पाचे भूमीपूजन, जिल्हा औद्योगिक …

Read More »

आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद कुलगुरूंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात- राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नोंदणी ३२ इतकी आहे. मात्र, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ड्रॉप आऊट दर जास्त आहे. हे चित्र …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, एकिकडे द्वेष पसरविणारा भाजपा तर दुसरीकडे लाचार… नूह मधिल हिंसाचार प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक

भाजपा-काँग्रेस दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमांची पर्वा नाही, अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांना सावध करत म्हणाले की, तुमच्या एका बाजूला जातीयवादी भाजपा-आरएसएस आहे. जे एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कमी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, आदिवासी संस्कृती संपवण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा भाजपा सरकारच्या काळात आदिवासी समाजावरचे अत्याचार वाढले

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यातील ५५ वर्ष केंद्रात काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना आदिवासी समाजावर अत्याचार होऊ दिले नाहीत पण भाजपा सरकारच्या काळात मात्र मणिपूर असो वा महाराष्ट्र सर्व भागात अत्याचार वाढले आहेत. आदिवासीच या देशाचा मुळनिवासी आहे, जल, जमीन जंगलवर त्यांच्याच अधिकार आहे परंतु आदिवासींची …

Read More »

आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी …

Read More »

आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनीची पूर्ण मालकी देण्यासाठी सरकार पुढाकार घेणार का? काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात विचारणा

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने कायदा करून आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनी दिल्या. आदिवासी बांधव त्यांच्या हक्काच्या जमिनीवर अतिक्रमित म्हणून राहात होते, तो ऐतिहासिक अन्याय यूपीए सरकारने दूर केला. मात्र त्या कायद्याप्रमाणे अनेक ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसत नाही, शिवाय आदिवासी बांधवांचे नाव इतर हक्कात येते, त्यामुळे त्यांना शेती कर्ज घेण्यात …

Read More »

राष्ट्रपती म्हणाल्या, आदिवासी क्रांतिकारकांवर अधिक संशोधन करण्याची गरज राज्यपाल भवनाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून राष्ट्रपतींना माहिती

मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी बंकरमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रपतींनी प्रथम राज्यातील तसेच देशातील आदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देऊन आदिवासी क्रांतिकारकांबाबत …

Read More »

भाजपाच्या युवा नेत्याने केली आदिवासी मुलावर लघवीः हाच का हिंदूत्ववादाचा खरा चेहरा मध्य प्रदेश मधील घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल

भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या समर्थक अंध भक्तांकडून एकही संधी सोडली जात नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून वारंवार त्याचा उल्लेख करत एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जाते. मात्र दलित-आदिवासी समाजाबद्दल भाजपाच्या हिंदू नेत्यांना किती कळवळा आहे या एक धक्कादायक व्हिडिओ …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, आदिवासी हेच मुळनिवासी देशाचे खरे मालक

आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या २४ वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी व मालक आहेत, …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, मोदी सरकारने आदिवासींचे जल-जंगल-जमीनीचे अधिकार काढून घेतले

आदिवासींच्या हक्क व अधिकारासाठी आदिवासांचे जननायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केला. बिरसा मुंडा यांची आज १२२ वी जयंती आहे. पण आदिवासींना त्यांचे हक्क मिळू दिले जात नाहीत. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हिताचे निर्णय घेतले होते पण वन अधिकार अधिनियम २००६ व भूमी अधिग्रहण कायदा २०१३ यातून त्यांना हक्क मिळाले …

Read More »