नगरपालिका आणि पंचायतींमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण ४२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती देणाऱ्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली [तेलंगणा राज्य विरुद्ध बुट्टेमगरी माधव रेड्डी]. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी घेतलेल्या राज्याच्या या निर्णयामुळे एकूण आरक्षण (ओबीसी, एससी, एसटी इत्यादी) ६७ टक्क्यांपर्यंत पोहोचले. …
Read More »चारमिनार जवळील गुलजार इमारतीला आग, आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू इमारतीत अडकलेल्या १७ जणांना वाचविण्यात यश
हैद्राबाद येथील ऐतिहासिक वास्तू चारमिनारच्या जवळ असलेल्या गुलजार हाऊसजवळ शनिवारी पहाटे आग लागून आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला. तेलंगणाच्या मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व बळी एकाच कुटुंबातील आहेत. पीडितांमध्ये प्रल्हाद (७०), मुन्नी (७०), राजेंद्र (६५), सुमित्रा (६०), हमये (७), अभिषेक (३१), शीतल (३५), प्रियंस (४), इराज (२), …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तेलंगणाने जातनिहाय वर्गवारी करणारे पहिले राज्य ठरले अनुसूचित जातीतील वर्गवारी निश्चित करत गॅझेट प्रसिद्ध
तेलंगणा सरकारने तेलंगणा अनुसूचित जाती (आरक्षणाचे तर्कसंगतीकरण) कायदा २०२५ ची अंमलबजावणी अधिसूचित केली आहे. राज्याने १४ एप्रिल २०२५ हा अनुसूचित जाती (SC) चे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यासाठी नियुक्त दिवस म्हणून राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. गेल्या वर्षी १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिचिन्ह निकालानंतर अनुसूचित जातींचे वर्गीकरण कार्यान्वित करणारे तेलंगणा …
Read More »तेलंगणातील जात सर्वेक्षण समितीवर अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांची नियुक्ती ११ सदस्यांमध्ये आर्थिक तज्ञ म्हणून थॉमस पिकेटी आणि जेन ड्रिज, सुखदेव थोरात यांचा समावेश
तेलंगणातील काँग्रेस सरकारने अलिकडच्या जात सर्वेक्षणातील निष्कर्षांचे “विश्लेषण” करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांसाठी धोरणांसाठी “सर्वसमावेशक आणि पुराव्यावर आधारित शिफारसी” तयार करण्यासाठी ११ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी यांचा समावेश असल्याने पॅनेलने लक्ष वेधले, भाजपाने “फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ काय आणतात” असा प्रश्न विचारला. “काँग्रेसचा मूलभूत विश्वास असा आहे की …
Read More »पोलिस आयुक्त म्हणाले, अल्लू अर्जूनच्या विरोधातील खटला पुढे चालविणार चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगूनही घटनास्थळावरून निघण्यास नकार
तेलंगणा पोलिसांनी रविवारी सांगितले की तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनने हैदराबाद चित्रपटगृह सोडण्यास नकार दिला जेथे त्याच्या चित्रपट पुष्पा २ चा प्रीमियर ४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता तरीही त्याला थिएटरबाहेरील गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. अर्जुनने “बाहेरील समस्यांबद्दल” कळताच त्याने संध्या थिएटर सोडल्याचे सांगितल्याच्या एक दिवसानंतर …
Read More »पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या आरोपावर काँग्रेसचे थेट आव्हान, राज्यात या आणि बघा गरिबांचा पैसा गरिबांना दिला तर भाजपाला पोटदुखी का? गॅरंटींच्या पूर्ततेसाठी बजेटमध्ये तरतूद: सुखविंदर सुख्खू.
काँग्रेसने कर्नाटक, तेलंगाणा, हिमाचल प्रदेशात जाहिर केलेल्या गॅरंटी दिल्या नाहीत अशा खोट्या जाहिराती वर्तमानपत्रात देऊन भाजपाने राज्यातील जनतेची दिशाभूल केली, त्याची सविस्तर चिरफाड काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या ऐतिहासिक पत्रकार करण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांचा आणि भाजपच्या नेत्यांचा खोटारडेपणा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, व कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. …
Read More »भाजपाच्या खोट्या प्रचाराची काँग्रेस करणार पोलखोल काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री व एक उपमुख्यमंत्री भाजपाचे फेक नॅरेटिव्ह खोडून काढणार
भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रात मोठ्या जाहिराती देऊन काँग्रेस शासित कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत असा खोटा प्रचार करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे हे फेक नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी व महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खु, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत …
Read More »तेलंगणा सत्ता बद्दल केसीआर-पंतप्रधान मोदी यांची भेट भाजपालाही केसीआर यांच्या राज्यसभेतील खासदारांची गरज
तेलंगणातील सत्ताबदलानंतर बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे अस्तित्व मर्यादीत झाले आहे. त्यातच के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविथा यांना दिल्लीतील कथित लीकर पॉलिसी धोरण तयार करण्यात सहभाग असल्या प्रकरणी सध्या तुरुंगात आहे. त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही. तर दुसऱ्याबाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याशी …
Read More »राहुल गांधी म्हणाले,… यही नियत और आदत भी तेलंगणातील शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतच कर्ज माफ
लोकसभा निवडणूकीपूर्वी तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आज पूर्तता करत शेतकऱ्यांचे दोन लाख रूपयांपर्यंतचे ३१ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहिर केला. यासंदर्भात रेवंत रेड्डी यांनी आज राज्य …
Read More »हेमंत सोरेन यांना ५ दिवसाची ईडी कोठडी, चंम्पाई सोरेन नवे मुख्यमंत्री
झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ८.५ एकर जमिन घोटाळ्या प्रकरणी आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी यांना ईडीने अटक केल्यानंतर रांची येथील ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची कोठडी विशेष न्यायालयाने सुनावली. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय हेमंत सोरेन यांनी …
Read More »
Marathi e-Batmya