Breaking News

Tag Archives: subhash desai

उद्योगांचे वीज दर कमी होणार ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. यासाठी पुढील पावले उचलली जातील, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. उद्योगांना वीज दरात सवलत, ओपन ॲक्सेस आदी विषयांवर सह्याद्रि अतिथीगृह …

Read More »

शिवसेनेच्या नेते, मंत्र्यांबरोबर राज ठाकरेंवरील सर्व गुन्हे राज्य सरकार मागे घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर गृह आणि विधी व न्याय विभागाकडून कार्य पध्दती निश्चिती सुरु

मुंबई : विशेष प्रतिनिधी तब्बल २६ वर्षानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या शिवसेनेने पक्षातील नेते आणि मंत्र्यावर असलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला असून फक्त शिवसेनेच्याच नेत्यांवरील गुन्हे मागे घेतले जात असल्याचा आरोप होवू नये यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य …

Read More »

मुंबईतल्या फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण करणार मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २०१४ मध्ये असे सर्व्हेक्षण झाले होते. आता सर्व्हेक्षणासंदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांनाही स्थान देण्यात येईल. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट सिंगापूर, जपानसह देशातील उद्योगपतींबरोबर ३५ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार आणि गुंतवणूकदार यांच्यात एक विश्वास आहे. त्यामुळे मागील सांमजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत राज्यात १ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मँग्नेटीक महाराष्ट्र २.० अंतर्गत राज्यात सिंगापूर, जपान यांच्यासह देशातील विविध उद्योगपतींसोबत ३५ …

Read More »

देशातील पहिल्या कांदा साठवणुकीच्या ‘महाओनियन’च्या सहा प्रकल्पांचे लोकार्पण पिकांच्या साठवणुकीसाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिले. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य शासन, नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून देशातील पहिला कांदा साठवणूक …

Read More »

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे पण कोरोना मुक्त आमदारांनाच प्रवेश ७ आणि ८ सप्टेंबरला घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री …

Read More »

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कुठल्याही वनेतर उपक्रमांना परवानगी नाही पश्चिम घाट जैवविविधता संवर्धनाबाबत बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली. पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत  मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी …

Read More »

कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान प्रकल्पास राज्य सरकार देणार जमिन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिकदेखील यशस्वी झाले आहे. यापुढे …

Read More »

राजशिष्टाचार मंत्र्यांकडूनच शिष्टाचाराचे उल्लंघन पद्म पुरस्कारासाठी नावे सुचविण्यासाठीच्या समितीचे आदित्य ठाकरे बनले अध्यक्ष

मुंबई: विशेष प्रतिनिधी लोकशाहीप्रणालीत लिखित कायद्यांबरोबरच लोकाशाही मुल्यांना अर्थात संकेताना फार महत्व असते. त्यामुळे कोणत्याही समितीची स्थापना करताना किंवा त्याच्या अध्यक्षाची नियुक्ती करताना अनुभवी आणि तज्ञ असलेल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीची निवड केली जाते. मात्र राज्य सरकारने पद्म पुरस्कारासाठी नावे सुचविण्यासाठी एका समितीची स्थापना राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. मात्र …

Read More »

महाराष्ट्र सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना मिळणार १५ लाखपर्यंतची शासकीय कामे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील, अशी घोषणा कौशल्य विकास …

Read More »