Breaking News

Tag Archives: subhash desai

राज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’ पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना- सुभाष देसाई

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सुक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. स्तावित अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी आज देसाई यांच्या …

Read More »

वाघांसाठी दोन गावांचे पुर्नवसन करा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी अलीकडील काळात महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात सध्या ३१२ वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्या भागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांचा अधिवास सुधारण्याच्या दृष्टीने ताडोबा  व्याघ्र प्रकल्पाच्या आतील रानतळोधी व कोळसा तसेच प्रकल्पाच्या बाहेरील पण वन्यजीव अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे …

Read More »

‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी, हे वेब पोर्टल निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

भिलारगावच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार प्रदान

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. मराठी भाषेचा जागर व्हावा यासाठी पुस्तकाचं गाव उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये राज्यात एकच पुस्तकाचं गाव का असावे? असे नमूद करून तळा गाळातील मराठी भाषा, तिच्या वैशिष्ट्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करतो. मग मराठी भाषेचा विकास तिथपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात …

Read More »

वर्षात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून  पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत (वर्षभरात) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य …

Read More »

खर्डी आणि अंबरनाथमधील जमिनीत एमआयडीसीतील कोणाचा रस? डोंगराळ आणि संवेदनशील पर्यावरण भागातील जमिनीची खरेदी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात उद्योजकांना सहजरीत्या जमिनी उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एमआयडीसीकडून प्रत्येक जिल्ह्यात-शहरात जमिनीची खरेदी केली जाते. याचाच भाग म्हणून एमआयडीसीने वाशिंद-शहापूरच्या दरम्यान संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रात मोडणारी १ हजार एकर आणि अंबरनाथ मधील डोंगराळ असलेली जमिन जी कोणत्याही स्वरूपात उद्योग उभारणीसाठी अनुकूल नसताना का खरेदी केली …

Read More »

लघु उद्योग महामंडळ, खादी ग्रामोद्योगच्या या वस्तू आता फ्लिपकार्टवर या दोन संस्थांबरोबर सामंजस्य करार- उद्योग मंत्री देसाई

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या लघु उद्योग महामंडळ तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाकडून उत्पादीत होणाऱ्या वस्तूंना देशीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यातील स्थानिक कामगार विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांनी तयार केलेल्या वस्तुंना देशव्यापी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योगमंत्री …

Read More »

राज्यातील पाच लाख युवक-युवतींच्या सुक्ष्म व लघु उद्योगासाठी अर्थसंकल्पात तरतूद 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती' कार्यक्रमाअंतर्गत 'माझा व्यवसाय माझा हक्क' उपक्रमांचा शुभारंभ

बारामती : प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सूक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे सांगतानाच, या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात उद्योजक तयार होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

शेतकऱ्यांनो वीज बीले भरा आणि ५० टक्के सवलत मिळवा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कृषीपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. महावितरणने तयार केलेल्या कृषी …

Read More »

औरंगाबाद नामांतर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले शिवसेनेला ढोंगी म्हणे शिळ्या कढीला ऊत आणला जातोय

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावरून धुराळा उठत असतानाच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नामांतरचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला चक्क ढोंगीपणाची उपमा देत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा …

Read More »