Breaking News

Tag Archives: schools

१५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी ६५ हजारहून अधिक शाळांमध्ये मेळावे राज्यातील ६५ हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये

शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे. यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते. शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी, या विचाराने महाराष्ट्रात ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी अभियान’ हाती घेतले आहे. या अंतर्गत राज्यातील ६५ हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे …

Read More »

राज्यातील शाळा १५ जून पासून पण विदर्भातील ‘या’ तारखेपासून होणार सुरु शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात …

Read More »

पुढील वर्षापासून शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून १० सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, कमी पटसंख्येच्या शाळांबाबत धोरण स्पष्ट करा दुर्गम आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था काय ?

युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला आहे. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. एका …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान, फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळेसाठी भीक मागितली नव्या राजकिय वादाला सुरुवात

मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठलं होतं. तसेच भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजी राजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. या वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यपालसह भाजपा विरोधात …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा

राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे समजते. कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरिब व सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील …

Read More »

दहावीचा निकाल ९६.९४ टक्के; उत्तीर्णमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आवड आणि कल यानुसार पुढील मार्ग निश्चित करा- शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड

“कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही आपल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने, धैर्याने, संयमाने व परिश्रमाने अभ्यास पूर्ण करत दहावीची परीक्षा दिली. शिक्षणाप्रती त्यांच्या या समर्पणभावाला सलाम,” अशा भावना शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केल्या. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या …

Read More »

‘या’ कारणासाठी राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे होणार फुले देवून स्वागत शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात १५ जून रोजी तर विदर्भात २७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंबंधीच्या परिपत्रकाद्वारे शिक्षण …

Read More »

१५ जूनपासून शाळा सुरु राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जून पासून विद्यार्थी १५ जूनपासून शाळा सुरु

मागील दोन वर्षापासून राज्यात कोविडमुळे शालेय शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. त्यामुळे जवळपास १ ली ते १० पर्यंतच्या विद्याथ्यांच्या परिक्षाही घेता आल्या नाहीत. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विस्कळीत झालेले शाळांचे वार्षिक वर्ष नियोजित पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने १३ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला असून १५ …

Read More »

शाळांना मिळणार वाढीव अनुदान उपमुख्यमंत्र्यांची मान्यता-मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

१३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्या/ अतिरिक्त शाखावरील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान व ज्या शाळा २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि काही शाळांच्या त्रुटींमुळे अनुदान सुरू करता आले नव्हते. …

Read More »