Breaking News

Tag Archives: rajesh tope

विदर्भातील ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त मृत्यूनंतर उघडकीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस

वर्धा: प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एक ३५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह. महिलेला शासकीय रुग्णालयात भरती होण्यासाठी नेत असताना मृत्यू. विनोबा भावे सावंगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे ८ तारखेला त्यांचा स्त्राव घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला. हिवरा तांडा गाव सील. आर्वीतील खाजगी रुग्णालय सुद्धा सील. तसेच …

Read More »

दोन महिन्यात २० हजार रूग्ण तर २४ तासात सर्वाधिक ४८ जणांचे मृत्यू मुंबई-ठाणे मंडळ १५ हजार ५९५ : दिवसभरात ३३० बरे होवून घराकडे

मुंबई: विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन महिन्यापूर्वी अर्थात ९ मार्चला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे ४ रूग्ण आढळून आले होते. तेव्हापासून सातत्याने या संकेत वाढ असून आज दोन महिने पूर्ण होण्याच्या अर्थात ९ मे या दिवशी राज्याने २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार पाडत २०,२२८ वर संख्या पोहोचली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मृत्यूही …

Read More »

कालचा विक्रम मोडत आज १३६२ रूग्णांची वाढ राज्याची संख्या १८ हजारावर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनोग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या संख्येत आजही खंड पडलेला नाही. काल १२३३ रूग्ण आढळून आले होते. त्यात आज १४० ने वाढ होत ही संख्या १३६२ वर पोहोचली असून राज्यातील रूग्णांची संख्याही १८ हजार पार पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक माध्यमातून संवाद साधताना …

Read More »

गल्लाभरू डॉक्टरांपासून स्थलांतरीत कामगारांची सुटका प्रवासासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी मोफत करण्याची राज्य सरकारची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगारांना प्रवासासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टरांकडून घेण्याची अट राज्य सरकारने घेतली. मात्र या निर्णयाचा गैरफायदा काही गल्लाभरू डॉक्टरांनी घेण्यास सुरुवात करत अव्वाच्या सव्वा रक्कम आकरण्यास सुरुवात केल्याने या कामगारांना आणखीनच अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे अखेर लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जावू …

Read More »

२४ तासात १२३३ रूग्ण…. चार दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी संख्या ३४ जणांचा मृत्यू मुंबईतील २५ जणांचा समावेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने विक्रमी आकडे पार करण्याची नवी पंरपरा सुरु केल्याचे दिसून येत आहे. गेल्या शनिवारी २ मे रोजी एकाच दिवसात १ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर चार दिवसात २४ तासात राज्यात १२३३ रूग्णांचे कोरोना निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्ण संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली असून ३४ जणांचा …

Read More »

सोलापूरात ८ ने वाढ होत १५० चा टप्पा ओलांडला मृतकांची संख्या १० वर पोहोचली

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज या संख्येत ८ ने वाढ झाली आहे. तर आज एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या आता १० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधीतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. दिवसभरात २ हजार ६३३ जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २ हजार २१६ …

Read More »

आणखी दोन स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मुंबईवरून येणाऱ्यांवर बंदी अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी काढले आदेश

मुंबई: प्रतिनिधी ज्या मुंबई शहरात मिळणाऱ्या रोजगाराच्या जीवावर मुंबईच्या आजूबाजूला शहरे वसली आता त्याच लहान-मोठ्या शहरांकडून उपनगरातून मुंबईमध्ये कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्याचे सत्र सुरु केले. काल कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांनी अशा आशयाचे पत्रक काढल्यानंतर आता अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांनी असे पत्रक काढत ८ मे पासून परतणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. …

Read More »

रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्टने त्यांच्या सुविधा आणि रूग्णालये आम्हाला द्या राज्यभरातील केंद्रीय संस्थांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरीत्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य …

Read More »

मुंबईला १० हजारसाठी फक्त ५५ कमी तर महानगरचा ११ हजाराचा टप्पा पार राज्याची संख्या १५ हजार ५२५ + १४३ एकूण १५ हजार ६६७ वर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर एकट्या मुंबई शहरातील रूग्णांची संख्या ९ हजार ९४५ वर पोहोचली. तर मुंबई आणि ठाणे मंडळाची संख्या ११ हजार ७०४ वर पोहोचली आहे. राज्यात आज ८४१ नवे रूग्ण आढळून आले असून ही संख्या अशीच वाढत राहील्यास …

Read More »

दिलासादायक: एकाच दिवसात बरे होवून घरी जाणाऱ्यांचा विक्रम आरोग्ययंत्रणेच्या प्रयत्नांना यश

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात २२८ रुग्ण काल घरी गेले. …

Read More »