Breaking News

मुंबईला १० हजारसाठी फक्त ५५ कमी तर महानगरचा ११ हजाराचा टप्पा पार राज्याची संख्या १५ हजार ५२५ + १४३ एकूण १५ हजार ६६७ वर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर एकट्या मुंबई शहरातील रूग्णांची संख्या ९ हजार ९४५ वर पोहोचली. तर मुंबई आणि ठाणे मंडळाची संख्या ११ हजार ७०४ वर पोहोचली आहे. राज्यात आज ८४१ नवे रूग्ण आढळून आले असून ही संख्या अशीच वाढत राहील्यास मुंबई महानगरात दिलेल्या सवलतीत पुन्हा कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील रूग्णसंख्येने १५ हजाराचा टप्प्या ओलांडत १५ हजार ५२५ वर पोहोचली आहे. तसेच  १४३ रुग्ण डेटा क्लिनिंग प्रक्रियेमुळे वाढले आहेत. तर मृतकांच्या संख्या कालच्या तुलनेत फक्त एकने कमी झाली असून काल ३५ जणांचा तर आज ३४ जणांचा मृत्यू झाला. तसेच २ हजार ८१९ रूग्ण बरे होवून गेले आहेत.

आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २६, पुण्यातील ६ , औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ८२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,८२,८८४ नमुन्यांपैकी १,६७,२०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५,५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ९९४५ ३८७
ठाणे ८२
ठाणे मनपा ४६६
नवी मुंबई मनपा ४१५
कल्याण डोंबवली मनपा २२७
उल्हासनगर मनपा १२
भिवंडी निजामपूर मनपा २०
मीरा भाईंदर मनपा १८२
पालघर ३१
१० वसई विरार मनपा १६१
११ रायगड ५६
१२ पनवेल मनपा १०७
ठाणे मंडळ एकूण ११७०४ ४१६
१३ नाशिक २१
१४ नाशिक मनपा २७
१५ मालेगाव मनपा ३६१ १२
१६ अहमदनगर ४४
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे
१९ धुळे मनपा २४
२० जळगाव ४७ ११
२१ जळगाव मनपा ११
२२ नंदूरबार १९
नाशिक मंडळ एकूण ५७१ ३०
२३ पुणे १०३
२४ पुणे मनपा १८३६ ११२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२३
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा १२७
२८ सातारा ७९
पुणे मंडळ एकूण २२७१ १२८
२९ कोल्हापूर
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी १०
कोल्हापूर मंडळ एकूण ६२
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ३३७ ११
३७ जालना
३८ हिंगोली ५५
३९ परभणी
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण ४०५ १२
४१ लातूर १९
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा २८
लातूर मंडळ एकूण ५४
४७ अकोला
४८ अकोला मनपा ५६
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ५९
५१ यवतमाळ ९२
५२ बुलढाणा २४
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण २४१ १७
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा १७९
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
नागपूर एकूण १८७
इतर राज्ये ३०
एकूण १५५२५ ६१७

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *