Breaking News

Tag Archives: ncp

शरद पवारांच्या घरावरील हल्ला निषेधार्ह; ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे एस. टी. कामगारांना भडकावणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोलेंची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे, या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत? त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करा, अशी मागणी …

Read More »

नाना पटोले म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर व भारनियमनावर शरद पवार यांच्याशी चर्चा आयएनएस ‘विक्रांत’चे पैसे गेले कुठे, याचे भाजपाने उत्तर द्यावे

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यावर विजेचे संकट ओढवले असून केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पुरेसा कोळसा पुरवठा केला जात नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर कारवाया केल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पवारांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी करणार घटना दुर्दैवी असल्याचे मत

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आज एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल करत पवारांच्या घरावर चपला आणि दगडफेक केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या घटनेची चौकशी करणार असल्याची घोषणा करत ज्या काही अदृश्य शक्ती आहेत. त्यांच्यावर कारवाई …

Read More »

“या” दोन मराठी अभिनेत्रींनी केला अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश...

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश करणार्‍यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. कोरोनाच्या संकटातून पूर्वपदावर महाराष्ट्राला आणले आहे. तरीही लोकांनी मास्क लावून काळजी घ्यावी असे आवाहन करत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण …

Read More »

अजित दादा म्हणाले, आम्ही पवारसाहेबांशी बोललो त्यांनी आम्हाला सांगितले… काहीजण जाणीवपूर्वक बातम्या पसरवून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न

शरद पवार व पंतप्रधान यांची दिल्लीत भेट झाली. त्यानंतर पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीचे कारण स्पष्ट केले आहे त्यामुळे त्या भेटीचा पुनरुच्चार मी करावा असं मला वाटत नाही असे सांगतानाच नवाबभाई व अनिल देशमुख यांच्याबाबत विचारले नाही असे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याबाबत आम्ही पवारसाहेबांशी बोललो. पवारसाहेबांनी सर्व विषयावर …

Read More »

विक्रांतच्या नावे गोळा झालेली लोकवर्गणी कोणाच्या खिशात केली ? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

युद्धनौका आयएनएस विक्रांतचे रूपांतर संग्रहालयात करा व त्यासाठी लागणारा निधी आम्ही लोकवर्गणीतून गोळा करू असे किरीट सोमय्या हे व भाजप पदाधिकारी म्हटले होते. हा निधी राज्यपालांकडे सुपूर्द केला जाईल आणि या निधीचा उपयोग विक्रांत संग्रहालय करण्यासाठी करावा हा उद्देश होता. राजभवनाच्या पत्रात निधी मिळाल्याचा कसलाच उल्लेख नाही व गोळा केलेले …

Read More »

खात्याच्या अदली बदलीवरून शरद पवारांचे मोठे वक्तव्य, अदला-बदल नाही पण… पंतप्रधानांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली माहिती

काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपावर सूड उगविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृहमंत्री पद हवे आहे तशी शिवसेनेच्या काही आमदारांची इच्छा असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कारभारावरून नाराजी व्यक्त करत टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृह खाते शिवसेनेला देण्यात येणार असल्याच्या चर्चेने …

Read More »

ईडीच्या धाडी, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट तर्क-वितर्कांना उधाण

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर ईडीचे छापे पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊदशी संबधित प्रकरणात ईडीने थेट कारवाई करत अटक केली. त्यास महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच नुकतेच शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींची मालमत्ताही जप्त करण्यात …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अधिकाऱ्यांना, आपल्यावर सीबीआयची नजर मी सांगितले तरी ऐकू नका पण...

राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आणि १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु झाले असून आता नव्याने निविदा, निधी वाटप यासंदर्भात प्रशासकिय पातळीवर बैठकांचे सत्र सुरु झाले. मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश देत म्हणाले की, सीबीआयची नजर आपल्यावर असून मी सांगितले तरी ऐकू नका असे …

Read More »

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची राज ठाकरेंना विनंती

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. आज राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी वरील विनंती केली. महाराष्ट्र शांत आहे… कुठेही क्लेश नाही… द्वेष दिसत नाही… सर्व …

Read More »