Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अधिकाऱ्यांना, आपल्यावर सीबीआयची नजर मी सांगितले तरी ऐकू नका पण...

राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आणि १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु झाले असून आता नव्याने निविदा, निधी वाटप यासंदर्भात प्रशासकिय पातळीवर बैठकांचे सत्र सुरु झाले. मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश देत म्हणाले की, सीबीआयची नजर आपल्यावर असून मी सांगितले तरी ऐकू नका असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीस सूत्रांनी दिली.
नुकतीच काही विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जवळपास प्रथम दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत स्पष्ट निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
काही विभागाकडून नव्याने निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर काही काढलेल्या निविदांवर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. यापार्श्वभूमीवर त्यासाठी काही नवी नियमावली तयार करायची की आहे त्याच नियमावलीनुसार पुढील कारवाई करायची या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी काही मंत्र्यांकडून तर कधी सत्ताधारी आमदारांकडून अमक्या-तमक्या ठेकेदाराला सदरचे काम मिळाले पाहिजे यासाठी दबाव आणला जातो. त्यामुळे अनेकवेळा प्रशासकिय अडचण होत असल्याची तक्रार या अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.
या पध्दतीचा दबाव आणण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदारांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत यावर काही तरी मार्ग काढा अशी विनंती केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, उद्या मी जरी तुम्हाला सांगितले तर तुम्ही ऐकू नका, जे नियमानुसार आहे. त्यानुसारच निविदा काढा, त्याला मंजूरी द्या पण नियमाच्या बाहेर जावून कोणतीही कृती करू नका अशा स्पष्ट शब्दात निर्देश देत आपल्यावर सीबीआयची नजर आहे हे विसरू नका असा इशाराही त्यांनी यावेळी बैठकीतील अधिकाऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे नियमानुसारच निविदा मंजूर करा आणि नियमात बसेल अशाच निविदा मंजूर करा असे निर्देश देत कोणत्याही अमिषाला बळी पडू नका नाही तर असा सज्जड दमही दिल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची मागणी, नेताजींच्या यांच्या अस्थी भारतात आणा जपान मध्ये असलेल्या अस्थी भारतात आणून गंगेत विसर्जन करा

आज देशभरात ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. सकाळी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published.