Breaking News

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पवारांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी करणार घटना दुर्दैवी असल्याचे मत

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आज एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल करत पवारांच्या घरावर चपला आणि दगडफेक केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या घटनेची चौकशी करणार असल्याची घोषणा करत ज्या काही अदृश्य शक्ती आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आंदोलकांना नम्र आवाहन आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
राज्यात या पध्दतीच्या घटना घडवून आणून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरु आहे. मात्र राज्य सरकारवर या गोष्टींमुळे कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करत या घटनेची चौकशी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार होते याची माहिती राज्यातील गुप्तचर विभागाला होती की नाही याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवरील सुणावनी सुरु होती. तसेच यावरील संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया जवळपास संपत आली आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी अशा पध्दतीची कृती करायला नको होती. न्यायालयीन आदेशाचा आदर करायला हवा होता अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *