Breaking News

Tag Archives: nanded

राज्यातल्या या नऊ जिल्ह्यांबाबत केंद्राने व्यक्त केली चिंता कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत लॉकडाऊन लागण्याची शक्यता

नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार …

Read More »

मुंबई समिश्र तर राज्यात भारत बंदला चांगला प्रतिसाद भाजपा वगळता सर्वपक्षियांचा सहभाग

मुंबईः प्रतिनिधी केंद्राच्या शेती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला भाजपातेर सर्व पक्षियांनी संपूर्ण पाठिंबा देत मुंबईसह राज्यातील अनेक भागात आंदोलन करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक रिक्षा संघटनांनी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. विशेषतः …

Read More »

मंत्री वडेट्टीवारांनी शेतकऱ्यांना दिले हे आश्वासन वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू सांगत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश

नांदेड : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला …

Read More »

अंदाज खरा ठरला ! मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस दुपारनंतर मान्सूनची हजेरी

मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि महानगरात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी हवामान खात्याने १२ आणि १३ तारखेला मान्सूनच्या सरी मुंबई, पुणे येथे कोसळणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. मुंबईत शहरातील बहुतांष भागात पावसाने दुपारी हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरींचा पाऊस पडला. मात्र नंतर …

Read More »

नांदेड, रायगड, औरंगाबादेत अडकलात, तेथून मूळ गावी जायचेय ? तर हे वाचा जिल्हा प्रशासनाकडे कसे अर्ज सादर करायचे आणि कोठे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील विविध भागातून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरू आदी अडकलेले आहेत. सद्यपरिस्थितीत नांदेड, रायगड आणि औरंगाबाद येथे अशा अडकलेल्यांनासाठी त्या त्या स्थानिक प्रशासनाने वेबसाईटची लिंक आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. त्यानुसार आपला अर्ज आणि फोनवरून संपर्क साधून आपल्या मूळ गावी जावू शकता. नांदेड जिल्ह्यातील …

Read More »

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत चाचणीच्या सुविधा द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटस्ही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय …

Read More »

नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले! सा. बां. मंत्री अशोक चव्हाण यांचे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणुमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. नांदेड शहरातील रहिवासी असलेले संकेत पानपट्टे, ऋतुज माने, अनिरूद्ध कुलकर्णी, गौरव देशपांडे, अमरदीप जगताप आणि शंकर नादरे हे हॉटेल मॅनेजमेंटचे सहा …

Read More »

गारपीटग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी नांदेड, परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांच्या पाहणीनंतर खा. अशोक चव्हाण यांची मागणी

नांदेड : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले असून नांदेड व परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांना भेट देत गारपीटग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली. तसेच गारपिटीमध्ये मरण पावलेल्या भागिरथी कांबळे यांच्या कुटुंबियांची चुडावा …

Read More »