Breaking News

Tag Archives: nana patole

मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? निवडणुकीच्या तोंडावर भाजपा कोणत्याही थराला जाईल, एकजुटीने लढा व विजय मिळवा: रमेश चेन्नीथल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मोदीची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात मी, मी पणा जास्त असतो. आपण ‘आम्ही भारताचो लोक’ असे म्हणतो परंतु मोदी मात्र मी, मी असेच करतात. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. २०१४ …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल,… सहा दिवसात २६ लाख लोकांचा सर्व्हे कसा ?

मराठा आरक्षण प्रश्नी सरकार समाजाची व मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक करत आहे. मराठा समाजाचा मागसलेपणा सिद्ध करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अत्यंत घाईगडबडीत सादर करण्यात आलेला आहे. या सर्व्हेत ५०० च्या वर प्रश्न आहेत एका अर्जाला तास ते दीड तास लागतो, मग कोणत्या आधारावर हा सर्वे केला? …

Read More »

नाना पटोले यांचा विश्वास, …हंडोरे विजयी होणार, आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपासह सर्व मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. राज्यसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपाकडून आयारामांना उमेदवारी, निष्ठावंत मात्र वंचितच

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे, अशी टीका …

Read More »

काँग्रेसची टीका, अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले!

अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात प्रदेश …

Read More »

जयराम रमेश यांची खोचक टीका, त्यांच्या जाण्यामुळे इतरांना प्रगतीच्या संधी

सध्या छत्तीसगडमध्ये पोहोचलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला आदीवासी बहुल कोरबु आणि सुरजगड येथे आज पोहोचली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना अशोक चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यावर विचारले असता फारच बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण यांच्या जाण्याने दुःख जरी झालेले असले तरी पक्षाच्या ताकदीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सांगितले. जयराम …

Read More »

काँग्रेसची खोचक टीका, सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले

कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व त्यांचे सरकार स्थापन केले पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाचा पराभव केला व काँग्रेसला बहुतमताने निवडून दिले. महाराष्ट्रातील सरकार ही जनतेने निवडून दिलेले नसून ED, CBI चे सरकार आहे असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट सरकारचा …

Read More »

राज्यपालांच्या भेटीत नाना पटोले यांनी केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचाराला कलंक लावण्याचे पाप राज्यातील महायुती सरकार करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात …

Read More »

नाना पटोले यांची खोचक टीका, त्यांना माणूस व कुत्र्यामधील फरकही समजेना

महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत, गुडांना कसलीच भिती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ बंगला तसेच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदक्कितपणे सुरु आहे. तडीपार गुडांना राजाश्रय, पोलीस …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शिंदे आणि फडणवीस दोघे मराठा, ओबीसी समाजाला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक मराठा व ओबीसी वाद निर्माण करून दोन्ही समाजाला एकमेकाविरोधात झुंझवत आहेत. छगन भुजबळ हे आपण राजीनामा दिल्याचे सांगत आहेत पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र याबाबत काहीच बोलत नाहीत. महाराष्ट्रात सध्या महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, शेतकरी …

Read More »