Breaking News

Tag Archives: nana patole

नाना पटोले यांचा आरोप राज्यात शिंदे-फडणवीस-पवारांचे गुंडाराज…

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करत आहेत यावरून महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा पोलीसांवर प्रचंड दबाव असून कायद्याने काम करु दिले जात नाही. आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, भुजबळांची सरकारने माफी मागावी, संजय गायकवाडांना निलंबत करा

राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल ज्या पद्धतीने अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरण्यात आली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले भुजबळ हे मागासवर्गीय समाजाचे आहेत म्हणूनच त्यांच्याबद्दल शिविगाळ करणारी भाषा वापरण्यात आली आहे, ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. भुजबळांबद्दल जी भाषा वापरली त्याबद्दल सरकारने माफी मागावी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, जुमलेबाज भाजपा सरकारचा आणखी एक जुमेलबाज अर्थसंकल्प

केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेहमीप्रमाणे मोठे मोठे आकडे सांगून काहीतरी भव्य केल्याचा आभास निर्माण केला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण, मध्यम वर्गासह सामान्य जनतेची या अंतरिम अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे. सर्वसामान्यांना लुटायचे आणि श्रीमंतांना वाटायचे हेच …

Read More »

पत्र जारी करूनही प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘वंचित’चा अद्याप मविआत समावेश नाही

वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीत समावेश झाला नाहीये, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले आहे. नाना पटोले यांना अधिकार आहेत की नाही हे स्पष्ट नसतांना ते पत्रव्यवहार करत आहेत. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, नितीशकुमार देशातील सर्वात मोठे पलटुराम…

इंडिया आघाडीच्या चार बैठकांना उपस्थित असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अचानक भूमिका बदलली, त्यांनी भूमिका बदलल्याचे आश्चर्य नाही. कारण ते आज एक बोलतात व उद्या दुसरेच बोलतात. राजकारणात विश्वास महत्वाचा असतो तो नितीशकुमार यांनी गमावला असून देशातील सर्वात मोठे पलटुराम झाले आहेत. नितीशकुमार यांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची स्पष्टोक्ती, ‘वंचित’शी चर्चेची जबाबदारी पटोले, थोरात, चव्हाणांवर

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त जागांवर विजय व्हावा यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय झालेला आहे. जागा वाटपाच्या चर्चा सुरु असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. महाराष्ट्रात मविआ व देशात इंडिया आघाडी मजबूत असून काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, शिंदे-भाजपा-अजित पवार सरकारने कोणाला फसविले…

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेलीच नाही. कोणाच्याही आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेका…

देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, बलिदान द्यावे लागले. सत्तेत आज धर्मांध शक्ती आहेत आणि लोकशाही, संविधान, सर्व लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली …

Read More »

महाविकास आघाडीचे वंचितला निमंत्रण, पण प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राच्या प्रमुख विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सहभागी करणार की नाही यावरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. त्यातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणूका जाहिर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणारे दोन मंत्री आता कुठे लपले?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. …

Read More »