Breaking News

पत्र जारी करूनही प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘वंचित’चा अद्याप मविआत समावेश नाही

वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीत समावेश झाला नाहीये, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले आहे. नाना पटोले यांना अधिकार आहेत की नाही हे स्पष्ट नसतांना ते पत्रव्यवहार करत आहेत. आम्हाला सांगण्यात आलं होतं की, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहेत ते निर्णय घेतील. त्या पत्रावर अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी नाहीये असेही स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, काल झालेल्या बैठकीत त्यांनी काही मुद्दे मांडले एक, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षणाचा मुद्दा, दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले आणि तीन काळया कृषी कायद्याला स्थगिती दिली. त्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीने स्पष्ट करावी, अशी मागणी केल्याचेही सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २ फेब्रुवारीच्या बैठकीत आम्ही दिलेला जो अजेंडा आहे तो आणि त्याच्याबरोबर जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला २ तारखेपर्यंत तयार होईल असे आम्ही मानतो. त्यांचा मसुदा आम्हाला दिला, तर संयुक्तरित्या चर्चा करायची की, एक-एक पक्षासोबत चर्चा करायची हा निर्णय त्या बैठकीत होईल असा इशाराही दिला.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, आम्ही बैठकीत खुलासा केला आहे की, केंद्रात पुन्हा भाजपाचे सरकार येणार नाही यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊ देणार नाही. काँग्रेसने आम्हाला जे पत्र दिले आहे, त्यावर नाना पटोलेंची स्वाक्षरी आहे. आम्हाला शंका आहे की, नाना पटोले यांना कोणाला सहभागी करून द्यायचे अधिकार दिले आहेत किंवा नाही दिले आहेत याची स्पष्टता आम्ही काँग्रेसला मागत आहोत. नाही, तर नाना पटोले एक करतील आणि काँग्रेस दुसरं काही करेल यात खूप अंतर होईल. असे त्यांनी म्हटले आहे. कारण, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले होते की, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना आघाडीच्या निर्णयाचे अधिकार दिले असल्याचे सांगितले होते. कालची ती सही त्यांची व्यक्तिगत असेल असा उपरोधिक टोलाही लगावला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही खुलासा केला आहे की, केंद्रात पुन्हा भाजपा सरकार येणार नाही, यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊ देणार नाही. आम्ही अगोदरपासून सांगत आहोत की, हे देशातील भाजपाचे सरकार देशाला धोकादायक आहे, म्हणून आम्ही त्यांचा विरोध करतोय. आपला इगो सोडून आरएसएस-भाजपाचे सरकार न येणे यासाठी आमची प्राथमिकता असल्याचेही नमूद केले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *