Breaking News

बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडून अर्थसहाय्य प्राप्त

बनावट कागदपत्रान्वये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्थसहाय्य प्राप्त झाल्याची कबूली आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाने ठाण्यातील त्या रुग्णालयावर पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याबाबत कळविले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बोगस प्रकरण किंवा शासनाची फसवणूक केली आहे त्याची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी अनिल गलगली यांस कळविले की डॉ. अनुदुर्ग ढोणी गणपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आंबिवली पूर्व ठाणे या रुगणालयाने बनावट कागदपत्रान्वये अर्थसहाय्य प्राप्त केल्याचे दिसुन आल्याने रुग्णालयातील डॉक्टर , कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्ती यांचा संशय आल्याने पुढील चौकशी करुन आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करणेबाबत पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांना ०६-११-२०२३ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अर्थसहाय्य प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी संपूर्ण विवरणासहित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे. यामुळे अशी अनेक प्रकरणे बाहेर येतील आणि बोगसगिरीवर आळा बसेल. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होईल.

 

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *