Breaking News

Tag Archives: MSP

मंत्री पियुष गोयल म्हणाले; मका डाळी कापसासाठी आधारभूत किंमत देण्यास तयार शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे

मागील काही महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतमालाला कायदेशीर हमी भाव द्या या मागणीवरून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांबरोबरील सततच्या चर्चेनंतर केंद्र सरकारकडून पाच वर्षांसाठी मका, डाळी आणि कापसासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्याची तयारी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी दर्शविली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी पियुष गोयल हे आज बोलत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी !

शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही मोदी सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारीही …

Read More »

शेतकरी आंदोलन पुन्हा पेटले; शंभू व खंजौरी बॉर्डरवर लाठीचार्ज, तर केंद्राकडून चर्चेचा प्रस्ताव

देशातील शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादीत मालाला कायदेशीर किमान आधारभूत किंमत मिळावी या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला. मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश बंदी केल्याने शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी शंभू बॉर्डर आणि खंजुरी बॉर्डरवर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यातच नुकतेच मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी …

Read More »

केंद्र सरकारचा एमएसपीला नकार, दिल्लीच्या सर्व सीमांवर १४४ लागू

शेतकऱ्यांच्या शेतमालाला एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत कायदेशीरदृष्ट्या लागू करावी या मागणीवरून पंजाब, हरियाणा राज्याबरोबर देशाच्या इतर भागातील विविध शेतकऱ्यांच्या संघटनांनी चलो दिल्लीचा नारा देत दिल्लीच्या सीमेवर पोहोचले. काल १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटेपासून दिल्लीच्या शंभू सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची दिल्लीत प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमले. परंतु शेतकऱ्यांना काहीही करून शंभू …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गॅरंटी, आम्ही देऊ एमएसपी…

देशातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला एमएसपी अर्थात आधारभूत किंमत मिळावी म्हणून पंजाब, हरियाणामधील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात चलो दिल्ली आंदोलन पुकारले. तसेच केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय जाहिर केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा निश्चय करून दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चा निघाला. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यावर …

Read More »

शेतकरी- पोलिसांमधील धुमचक्रीमुळे टिकरी बॉर्डर बंद, अडेलतट्टू भूमिका घेतल्यास..

देशातील शेतकऱ्यांच्या संघटनेने शेतमालाला हमी भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा चल्लो दिल्लीची घोषणा देत १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दिवसभरात पंजाब, हरियाणातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी सिंघू अर्थात शंभू सीमावर्ती भागात पोहोचले. पण आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झडप उडाल्याने अखेर दिल्लीच्या दिशेने असलेली टीकरी बॉर्डरवरील सुरक्षा आणखी …

Read More »

धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर

शासनाने पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान व भरडधान्याच्या (ज्वारी, बाजरी, मका व रागी) किमान आधारभूत किंमती (minimum support price MSP) जाहीर केल्या आहेत. सदर योजनेअंतर्गत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, हमीभावाचे गाजर दाखवून… शेतकऱ्यांची चेष्टा थांबवा; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील

देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवून केंद्र सरकारने सत्ता मिळविली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ ऑक्टोबरला हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. ही हमीभावाची वाढ केवळ कागदी खेळ आहे. नऊ वर्ष जनता केंद्र सरकारला सहन करत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. आता शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी. अन्यथा सरकारला याचे गंभीर …

Read More »