Breaking News

Tag Archives: monsoon session at mumbai

नाना पटोले यांची मागणी, सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवा सेतू कार्यालये अद्ययावत करण्यासाठी शासनाचे धोरण काय?

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले सेतू कार्यालयातून घ्यावे लागतात. ही सेतू कार्यालये जनतेच्या सुविधांसाठी आहेत परंतु या सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची सर्रास लूट केली जात आहे. १५ ते २० रुपयांच्या दाखल्यासाठी २०० ते ३०० रुपये घेतले जातात, जनतेची होणारी ही लूट सरकारने थांबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसीबाबत तीन महिन्यांत निर्णय घेणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित ‘एमआयडीसी’ सुरू करण्यासाठी पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे या अनुषंगाने नियम ९७ …

Read More »

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची माहिती

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री तानाजी सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, फसवणूक टाळण्यासाठी महारेरा आणि महापालिकेला डिजीटली जोडणार पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार

घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजीटल पद्धतीने लिंक करण्यात येईल. याशिवाय, अवैध बांधकामाला आळा घालण्यासाठी ज्या महानगरपालिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा महानगरपालिकांनी सॅटेलाईटद्वारे छायाचित्रे मिळवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नका शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालून भ्रष्टाचारमुक्त करा

मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे, पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचे दिसत आहे परंतु पावसाळी अधिवेशन ठरल्याप्रमाणे पूर्णवेळ झाले पाहिजे ही काँग्रेस …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, सावित्रीबाई यांच्याविरोधात लिखाण करणारे आरोपी कसे सापडत नाहीत? सरकारची भूमिका संशयास्पद; विरोधकांचा सभात्याग

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण एका संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले होते. त्यावर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र आतापर्यंत ते आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकावरही कारवाई का कऱण्यात आली नाही असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. यावेळी …

Read More »

सतेज पाटील यांचा इशारा, अलमट्टीतील पाणी सोडायला लावा अन्यथा, कोल्हापूर-सांगली… पूर उपाययोजनाबाबत दोन्ही राज्यांमध्ये तातडीने मंत्री स्तरीय बैठक घ्यावी

धरण क्षेत्रात असलेल्या पावसाच्या जोरामुळे कोल्हापूर, सांगली परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकची मंत्री स्तरीय बैठक तातडीने आयोजित करावी आणि अलमट्टी धरणाचा विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण, त्यांना कायदेविषयक अंमलबजावणीचे काम नाही… उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यानी निवेदन करण्याचे दिले होते आदेश

मुंबईसह राज्यात कंत्राटी पध्दतीने पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त एका वर्तमानपत्राने दिले. त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि भाजपाचे नेते तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. या निर्णयाचे पडसाद सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान …

Read More »

आरोग्य मंत्र्यांची घोषणा, राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार सांगलीतील प्रकरणानंतर आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांची माहिती

राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. “सांगली येथील वैदय योगेश माहिमकर यांनी केलेल्या एका प्रयोगात त्यांच्याकडे येत असलेल्या मधुमेहग्रस्त रुग्णांचे रक्त सांगलीमधील वेगवेगळ्या ४ नामांकित लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले, त्यानंतर या चारही लॅबचे रिपोर्ट …

Read More »

आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यूः फडणवीस म्हणाले, एखाद्या पेपरच्या बातमीवर इथे… काँग्रेससह विरोधकांचा सभात्याग

राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात होऊन जवळपास १० दिवस झाले. या १० दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच अधिवेशनाच्या तोंडावर इर्शाळगड येथे दरड कोसळून दुर्घटना घडली. त्यावरून पहिल्या आठवड्यात इर्शाळगड दुर्घटनेसंदर्भातील चर्चा विधानसभेत पाहायला मिळाली. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच पुरवणी मागण्यांमधील निधी वाटपाचा मुद्दा चर्चेत आला. या …

Read More »