Breaking News

Tag Archives: mns chief raj thackeray

त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली, हे पाप कोणाचे? मुंबईतील २४०४ मंदिरे व ११४४ मशिदीपैंकी ९२२ मशिदी व केवळ २० मंदिराकडे भोंग्यांची परवानगी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकरचा मुद्द्यावरून सुरु केलेले राजकारण हिंदूंचे नुकसान करणारे ठरत आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या नादात हिंदूंच्या सण उत्सवातही आता भोंगे वापरावर मर्यादा येऊ शकतात. आता मुस्लीम समाजाने स्वतः पहाटेची अजान बंद केली आहे, पण काकड आरतीही बंद झाली. या वादात मनसेमुळे हिंदूचेच अधिक नुकसान …

Read More »

संजय राऊत म्हणाले, भाजपा आणि मनसेमुळे हिंदू धर्मियांचा आज काळा दिवस भोंग्यामुळे काकड आरत्या बंद झाल्याने

भाजपाने मनसेला पुढे करून भोंग्याचा विषय आणून गोंधळा घालण्याचा प्रयत्न केला. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार राज्यातील तीर्थस्ताने आणि श्रध्दास्थांनावर सकाळच्या काकड आरत्या होतात. या आरत्यांना लोकांना प्रवेश दिला जातो. मात्र भोंग्याचा विषय निर्माण झआल्यामुळे या संपूर्ण देवस्थांनावर लाऊड स्पीकर लागले नाहीत त्यामुळे पंचक्रोशीतील लोकांनाही आनंद मिळतो. परंतु आज लाऊडस्पीकर न लागल्याने …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, विषय फक्त मस्जिदींचा नाहीतर मंदिरांचाही आहे भोंग्यावरून पुन्हा राज ठाकरेंनी मांडली भूमिका

भोंग्यामुळे लोकांना जो दिवसभराचा त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा आहे. हा विषय फक्त मशिदीवरील भोंग्यांचाच हा भाग नाही. मंदिरांवरचे ही आहेत अशी स्पष्टोक्ती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी करत मशिदींवरील भोंग्यांसाठी पोलिसांकडे इतके अर्ज आले इतक्याला परवानगी दिली, अशी माहिती दिली. आता मुंबईत, महाराष्ट्रात ज्या मशिदी आहेत त्या …

Read More »

संजय राऊत म्हणाले, आधी सुपारी देण्याचा शोध घेतला पाहिजे भाजपावर साधला निशाणा

एखाद्या राजकीय पक्षाला महाराष्ट्राची शांतता बिघडवायची असेल आणि त्यांना कोणी सुपारी दिली असेल तर सरकारने आधी सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. हिंदू ओवेसींना सुपारी देऊन महाराष्ट्रातील शांतता बिघडण्यासाठी जे काही सुरु आहे त्यासाठी सरकार सक्षम आहे. मी काल मुख्यमंत्र्यांशी बराच वेळ चर्चा केली. सगळं शांत आहे. कोणी मनात आणलं म्हणून …

Read More »

हनुमान चालिसा म्हणणाऱ्यावर राष्ट्रद्रोह तर आदेशाचे पालन करणाऱ्यांवर वरंवटा कायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे

हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार व एका आमदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे सांगणाऱ्यांवर आघाडी सरकार कारवाईचा वरवंटा फिरवत आहे. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले. …

Read More »

गुप्तचर विभागाचा इशारा, बाहेरचे लोक येवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट पोलिसांच्या बैठकीत गुप्तचर विभागाची माहिती

एकाबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याचा विषय लावून धरला असतानाच आणि त्यासाठी ४ मे चा अल्टीमेटम दिलेला असताना यापार्श्वभूमीवर राज्यात इतर राज्यातील लोक येवून कायदा व सुव्यस्था बिघडविण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला दिली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी …

Read More »

गुन्हा दाखल झाल्यावर इम्तियाज जलील म्हणाले की, फारचं साधी कलमं लावली कदाचित मुख्यमंत्र्यांना त्यांचा भाऊ असल्याने तसे वाटलं असेल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील सभेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीकास्तर सोडलं. विशेषत: राज ठाकरेंवर दाखल गुन्ह्यामध्ये जी कलमं लावण्यात आली आहेत, त्या कलमांविषयी …

Read More »

राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, बाळासाहेबांचे ऐकणार की, शरद पवारांचे ? पत्र लिहित हिंदू आपली ताकद काय ते राज्य सरकारला दाखवून देण्याचे आवाहन

औरंगाबादेतील सभेप्रकरणी पोलिसांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर मनसैनिकांना आपल्यापुढील ध्येय धोरणाची जाणीव होण्यासाठी राज ठाकरे यांनी थेट हिंदूधर्मियांना मस्जिदीसमोरील भोंग्याच्याविरोधात मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजवावी असे आवाहन करत त्यातून आपली ताकद दाखवून द्या असे सांगत भोंग्याप्रश्नी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात पहिल्यांदा सांगितलेले असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

मनसेप्रमुख राज ठाकरेंवरील गुन्हे दाखल केल्यानंतर मनसे म्हणाली, संघर्ष… संदिप देशपांडे यांचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत औरंगाबाद येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या मैदानावर आयोजित सभे दरम्यान राज ठाकरे यांनी ३ मे चा अल्टीमेटम दिला. मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेसाठी नियम व अटींसह परवानगी देण्यात आली. परंतु घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आयोजक संजय जेवरीकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. …

Read More »

औरंगाबादमधील सभेप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर “हे” गुन्हे दाखल पोलिसांकडून अटकेची शक्यता

औरंगाबाद येथील सभे दरम्यान अचानक अजाण सुरु झाल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना विनंती करत आताच्या आता पोलिसानी तेथे जावे आणि त्यांच्या तोंडात बोळा कोंबावा अशी विनंती केली. त्याचबरोबर यांना सरळ भाषेत सांगितलेले कळत नाही तर तर ह्याच्या आयला एकदा होवून जावूदेच अशी प्रक्षोभक भाषा वापरत सभेसाठी जमलेल्या समुदायाला …

Read More »