Breaking News

Tag Archives: maharashtra

राज्यातील २२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील ६९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यापैकी ४३ लाख १६ हजार ७६८ खात्यांच्या कर्जमाफीसाठी बँकांकडे पैसे पाठविण्यात आले आहे. तर २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खात्यावर प्रत्यक्ष पैसे जमा झाले असून एकाही शेतकऱ्याचा अर्ज फेटाळला नसून आजही कर्जमाफीसाठी अर्ज आला तर तो मंजूर करण्याची तयारी असल्याची माहीती मुख्यमंत्री …

Read More »

बोंडअळी व तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांना मदत तीन वेळा देणार कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे विधानसभेत आश्वासन

नागपूर: प्रतिनिधी मराठवाडा आणि विदर्भातील कापूस उत्पादनावर बोंडअळीचा हल्ला झाला. या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या. त्यानुसार अशा शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले असून बोंडअळी बरोबरच तुडतुड्याच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार, बियाणे विकणाऱ्या कंपन्या आणि विमा कंपन्याकडून मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन …

Read More »

विधान परिषदेत तिसऱ्य़ा दिवशीही गोंधळ सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे चार वेळा कामकाज तहकूब

नागपुर : प्रतिनिधी आज तिसऱ्या दिवसाचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होताच विरोधकांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. तर त्यास प्रत्युतर म्हणून सत्ताधारी सदस्यांनी जय विदर्भाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत विरोधक सभापतींच्या आसनाकडे धावले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने …

Read More »

बीजेपी-शिवसेनेच्या रूपाने राज्याला बोंडअळी आणि तुडतुड्याची लागण विरोधी पक्षांची राज्य सरकारवर टीका

नागपूर : प्रतिनिधी राज्यात भाजप, शिवसेनेचे सरकार येवून तीन वर्षे झाली. मात्र या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्राला उध्दवस्त करण्याचे काम केले असून या सरकारचे लाभार्थी हेच आहेत. सरकारच्या रूपाने महाराष्ट्राला बोंडअळी अन् तुडतुड्याची लागण झाली आहे. ‘बी फॉर बोंडअळी अन् बी फॉर बीजेपी’… ‘टी फॉर तुडतुडा अन् टी फॉर ठाकरे’ अशी टीका …

Read More »

कर्जमाफीच्या कामासाठी आज आणि उद्या बँका सुरु राहणार सर्व जिल्हा सहकारी बँकासह इतर बँकांना कार्यालये सुरु ठेवण्याच्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने १९ हजार ५३७ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिली. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासह इतर कर्जमाफीच्या कामाकरीता राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकासह बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज शनिवार ९ डिसेंबर आणि रविवारी १० …

Read More »

गुजरातची निवडणूक ठरविणार महाराष्ट्रातील राजकारण पुढील राजकिय वाटचालीच्या अनुषंगाने सर्वच राजकिय पक्षांकडून चाचपणी

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. गुजरात विधानसभेचा निकाल १८ डिसेंबरला जरी लागणार असला तरी त्या निवडणूकीच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकारणाची गणिते अवलंबून बदलणार असून शिवसेनेची भूमिका आणि विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे भवितव्यही ठरणार आहे. प्रत्येक राजकिय पक्षाकडून …

Read More »

विधान परिषद निवडणूकीत विरोधकांची मते पुन्हा फुटलेलीच भाजपच्या प्रसाद लाड यांना २०९ तर विरोधकांच्या दिलीप मानेंना अवघी ७३ मते

मुंबई: प्रतिनिधी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणूकीत कॉंग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत अपेक्षे  प्रमाणे प्रसाद लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र निकाल …

Read More »

कर्जमाफी योजनेंतर्गत १९ हजार ५३७ कोटी रूपये मंजूर ४१ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९, ५३७ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास ३१ डिसेंबर उजाडेल असे वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केल्यानंतर दोन तीन …

Read More »

आंबेडकरी चळवळीचे तीन तेरा ? दलित- आदीवासी नव्या राजकिय पर्यायाच्या शोधात

मुंबई : संजय बोपेगांवकर दलितांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर देशातील दलित, आदिवासी आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी सुरु केलेला लढा पुढे नेणे गरजेचे होते. मात्र गेल्या ५० ते ६० वर्षात विशेषत: महाराष्ट्रात या चळवळीचे नेमके काय झाले? याची चर्चा करणे सद्यपरिस्थितीत करणे बनणे क्रमप्राप्त बनले आहे. यातील विशेषत: …

Read More »

महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तरप्रदेश सरकार राबविणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तम दर्जाचे आहे. त्यामुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्तरप्रदेश सरकार राबविणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंग केले. लोअर परेल येथील पिरॅमल टॉवर येथे हार्वर्ड जागतिक आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य क्षेत्रातील आव्हान,सुधारणा आदी विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत …

Read More »