Breaking News

Tag Archives: maharashtra police

सॅनिटेशन डोम-टनेलला शास्त्रीय आधार नाही- व्यक्तींना अपाय होईल महाराष्ट्र आरोग्य विभाग आणि केंद्रीय आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई: विशेष प्रतिनिधी परदेशात कोरोनापासून बजाव करण्यासाठी सॅनिटेशन डोम-टनेल उभारून गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे व्हीडीओ मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ते व्हीडीओ पाहून राज्यातील पोलिस दलाकडून मोठ्या प्रमाणावर असे डोम-टनेलची निर्मिती करून जागोजागी लावण्यात आले. मात्र अशा डोम-टनेलला कोणताच शास्त्रीय आधार नसून त्यापासून कोरोना विषाणू …

Read More »

‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला …

Read More »

महाराष्ट्रातही बलात्कार, लैगिंक छळ आदींच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशनातच नवा कायदा मांडणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारच्या ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत हा कायदा बनविण्यासाठी विधेयक विधिमंडळात मांडण्यात येणार असून या कायद्याअंतर्गत बलात्कार, सामुहिक बलात्कार, अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. विधान …

Read More »

बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर पोलिस मुख्यालयात अनुभवायला मिळणार ‘चेंज ऑफ गार्ड’ गृहमंत्री देशमुख, पर्यावरण मंत्री ठाकरेंची संकल्पना

मुंबई: प्रतिनिधी लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात ‘चेंज ऑफ गार्ड’ ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ‘युनायटेड किंगडम’च्या राजघराण्याचा राजप्रासाद ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे सुरक्षारक्षकांचे अत्यंत प्रेक्षणीय असे ‘चेंज ऑफ गार्ड’ हे प्रात्यक्षिक होत असते. आठवड्यातील ठराविक …

Read More »

पंतप्रधानाच्या जीवाला धोका होता तर तपासात काय मिळालं? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भाजपावर टीका

मुंबईः प्रतिनिधी पुण्यातील एल्गार परिषद झाली. त्यानंतर कोरेगांव भीमा येथे दंगल उसळली. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. मात्र त्यावेळच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र मिळालं. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च असतात आणि त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणणे हास्यास्पद असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »

मुख्यमंत्र्यांमुळेच पोलिसांची पगार खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग करताना मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रचार समितीचे अध्यक्ष माजी खा. नाना पटोले यांनी केली. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस …

Read More »

पोलिसांचे भावविश्व, संवेदना समाजासमोर याव्यात गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच त्यांच्यातील भावविश्व व संवेदना समाजासमोर याव्यात. त्यांच्यातील अभिजात कलेबरोबरच समाजातील घटकांशी सुसंवाद घडवून समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने पोलिसांचे हे पहिलेच साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर यांनी आज येथे केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे …

Read More »

पहिले ‘दक्ष’ पोलीस साहित्य संमेलन मुंबईत होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन मुंबई : प्रतिनिधी रात्रंदिवस बंदोबस्त, गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच पोलीसांच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने ‘दक्ष’महाराज्य राज्य पोलीस साहित्य संमेलन २०१९ चे उद्घाटन सोमवारी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील …

Read More »