Breaking News

Tag Archives: ekanath shinde

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या ६ मजल्यावर फक्त मुख्यमंत्रीच पवार, खडसे, डॉ.बोंडेमुळे मविआचे मंत्री म्हणतात ६ मजला नको

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळात सध्या ७ मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उस्तुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दालन राहणार आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला …

Read More »

सरकार स्थिर होण्याआधीच शिवसेनेत एकमेकांविरोधात कुरघोड्या संभावित प्रतिस्पर्धी निर्माण होवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांकडे परस्पर विरोधी तक्रारी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडी सरकारचे स्थानापन्न होवून दोनच दिवस झाले. मात्र शिवसेनेत आपल्याच जिल्ह्यातील प्रतिस्पर्ध्याला मंत्री पदाची लॉटरी लागू नये यासाठी एकमेकांच्या विरोधात राजकिय षडयंत्र राबविण्याची सुरुवात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विद्यमान राज्याच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यातील …

Read More »

केंद्राला जाणारा लाखो कोटीचा कर माफ केल्यास महाराष्ट्र कर्जमुक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी दरवर्षी एकट्या मुंबईतून ३६ ते ४० टक्के करापोटी आणि उर्वरीत महाराष्ट्रातून ४ ते ६ टक्के कर केंद्राला जातो. हा कर साधारणतः दिड ते बावने दोन लाख कोटी रूपयांच्या घरात असून हा कर माफ केल्यास संपूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त होवू शकतो अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली. …

Read More »

शिकाँराकडून राज्यपालांच्या कार्यालयाकडे सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दाव्याचे पत्र सादर

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्री पदी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र या दोघांच्या सरकारला बहुमताचे संख्याबळ नसून ते संख्याबळ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकिय आघाडीला असल्याचा दावा या तिन्ही पक्षांनी करत सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावे अशी मागणी या …

Read More »

शिकाँराच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील बहुचर्चित शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार स्थापनेची निश्चिती झाली असून या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे राहणार आहे. तसेच उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सहमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. वरळी येथील नेहरू सेंटर येथील एका पंचतारांकित …

Read More »

वरळीतून माघार घे, वंचितच्या उमेदवाराला शिवसेनेकडून धमकी देत २ कोटींची ऑफर पोलिसात आणि निवडणूक आयोगाकडे वंचितची तक्रार

मुंबईः प्रतिनिधी संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा निर्विवाद विजय व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड यांना २ कोटी रूपयांची ऑफर देत उमेदवारी मागे घेण्याची धमकी दिल्याचा आरोप उमेदवार गौतम …

Read More »

अन्यथा झोपडपट्टीधारक विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार मुंबई आणि ठाणे झोपडीधारकांमध्ये भेदभाव करत असल्याचा संघटनेचा आरोप

ठाणेः प्रतिनिधी येत्या ४८ तासात ठाण्यातील 210 झोपडपट्टीतील रहिवाशांना मुबंईप्रमाणे ३०० स्क्वेअर फुटांचे घर दिले नाही तर येणाऱ्या सोमवारी झोपडपट्टीवासीयांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा काढूनही मागणी मान्य न झाल्यास आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ठाणे शहर झोपडपट्टी रहिवासी संघटनेने एका पत्रकार परिषदेत दिला आहे. २०११ …

Read More »

बीडमधील गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाचा अहवाल आरोग्य विभागास सादर महिलांना आरोग्य कार्ड देण्याची समितीच्या अध्यक्ष अँड. नीलम गोऱ्हे यांची शिफारस

मुंबई : प्रतिनिधी बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया संदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल आज सादर केला. ऊस तोडणीसाठी जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर महिलांची वैद्यकीय तपासणी करावी. त्यासाठी महिलांना आरोग्य कार्ड देणे, ऊस तोडणीच्या ठिकाणी साखर कारखान्यांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, खासगी रुग्णालयांनी गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत जिल्हा …

Read More »

आरोग्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंडळ करणार हवामान बदलाच्या परिणामाचा अभ्यास आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस निसर्ग आणि हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची (गव्हर्निंग बॉडी) तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मानवी आरोग्यावर वातावरणातील बदलाचा काय परिणाम …

Read More »

रुग्णवाहिका ठरली चाकावरचे प्रसुतीगृह आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान

मुंबई : प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. १०८ क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे …

Read More »