Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

काम सुरु असलेल्या या महामार्गाचा ६ कि.मी. प्रवास मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवित केला समृध्दी महामार्ग ठरणार विदर्भाची भाग्यरेखा

अमरावती : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा ठाकरे यांनी यावेळी गोलवाडी येथे घेतला. त्यानंतर  स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. विदर्भाच्या …

Read More »

मराठा आरक्षणावरील स्थगितीप्रश्नी या तारखेला होणार सुणावनी राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

मुंबई  : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणासंदर्भातील …

Read More »

पराभूत होवूनही भाजपाची शिवसेनेवर टीका शिवसेनेला भोपळा मिळाला : चंद्रकांत पाटील; शिवसेनेने आत्मचिंतन करावे : देवेंद्र फडणवीस

मुबंई: प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत महाविकास आघाडीला चार, भाजपाला एक आणि अपक्ष एका जागेवर निवडूण आले. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने त्यांना विजय मिळाला आणि हे स्वाभाविक होते. माझे त्यांना नेहमी आव्हान राहील की त्यांनी एकटे लढून दाखवा. मात्र …

Read More »

गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर होणार ही कारवाई आरोग्य विभागाकडून इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी …

Read More »

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून या सरकारला वेगवेगळ्या नावांनी पुकारले जात होते. मात्र हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत सरकारला पहिल्यांदाच धार्मिक अधिष्ठाण देण्याचा प्रयत्न केला. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या …

Read More »

महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा …

Read More »

चर्चेपासून पळ काढण्यापेक्षा दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांचे, अनेक समाजाच्या समस्या, मराठा समाजाच्या समस्यांवर चर्चा होणे आवश्यक असताना सरकार केवळ दोन दिवसाचे अधिवेशन घेवून अधिवेशनातील चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका करत दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याऐवजी दोन आठवड्यांचे घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत …

Read More »

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन या दोन दिवसांमध्ये होणार विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन ज्या पध्दतीने घेण्यात आले. त्याच पध्दतीने हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोनच दिवस चालणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली. या बैठकीला विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे …

Read More »

मराठा आरक्षण, कोरेगांव भीमा प्रकरणातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध सामाजिक आणि राजकिय प्रश्नी आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांवर डिसेंबर २०१९ पर्यंत तत्कालीन सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कोर्टाच्या आणि पोलिसी तुरुंगात अडकलेल्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. कोरेगांव भीमा येथे झालेल्या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. त्यामुळे सलग राज्यातील काही …

Read More »

राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा …

Read More »