Breaking News

Tag Archives: bmc

आदित्य ठाकरेंचे महापालिकेसह शिंदे गटाला आव्हान, या प्रश्नांची उत्तरे द्या सिमेंट रस्त्याच्या कंत्राटावरून विचारले थेट प्रश्न

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद मुंबई महापालिकेने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंटचे करण्याची घोषणा करत त्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची निविदा जाहिर करत त्याचे वाटपही केले. या निविदा वाटपावरून आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत निविदा वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच …

Read More »

अजित पवार म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या सांगण्यात १०० टक्के तथ्य अर्थसंकल्प झालेला असताना इतके पैसे कोठून आणणार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेत नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव अखेर शिवसेनेकडून अंतिम करण्यात आल्यानंतर आणि नाशिक व नागपूर जागेची काँग्रेस आणि शिवसेनेने आपापसात आदलाबदल केली. नाशिकच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती भूमिका राहणार याची माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी मुंबईतील सिमेंट रस्त्याच्या निविदेबाबत नुकतीच शिवसेना …

Read More »

साडेचार तासाच्या चौकशीनंतर आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले, शुन्य खर्च आला.. जंबो कोविड सेंटर उभारणी महापालिकेला शक्य नव्हती

कोरोना काळात मुंबई महापालिकेने कोविड सेंटरच्या वाटपात आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायलाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल नोटीस बजावत आज चौकशीसाठी पाचारण केले. याप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांची …

Read More »

आदित्य ठाकरेंचा इशारा, स्वतःला विकलं तेवढं पुरे, मुंबईचे एटीएम करू नका खोके सरकार मुंबईला विकायला निघालंय; मुंबईला विकू नका

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आलेलं खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत म्हणत माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका अशा शब्दात आदित्य ठाकरे …

Read More »

आदित्य ठाकरेंचा खोचक टोला, आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम स्थायी समितीने मंजूर केलेली १७०० कोटींची कामे आयुक्त कशी बदलू शकतात?; आदित्य ठाकरेंचा सवाल

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज गुरुवारी अंधेरी पूर्व येथील गुंदवली शाळेतील ज्युनियर-सिनियर केजीच्या वर्गाच्या नूतनीकरणाचं आज उद्घाटन केलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवत निवडणुका घेण्याचं खुलं आव्हान दिलं. महापालिकेच्या निवडणुका घ्या, तसंच विधानसभेच्या निवडणुका …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय

विकासकामे करताना भूमिपूत्रांवर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम करताना वरळी कोळीवाड्याजवळील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर ६० वरून १२० मीटर करण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. या भागातील कोळीबांधवांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची संख्या वाढवून कोस्टल रोड प्रकल्प …

Read More »

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य विकास मंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत झाला सामंजस्य करार

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आज राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, शालेय शिक्षण विभाग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता दर जैसे थे

आगामी मुंबई महापालिका निवडणूका नजरेसमोर ठेवत मुंबईतील मालमत्ता दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ या वर्षा करीता सुधारीत केला जाणार नसल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश, गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा

गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक  इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत …

Read More »

ऋतुजा लटके यांनी आयुक्तांची भेट घेत केली विचारणा, शिवसेना न्यायालयात

राज्यात शिवसेनेतील बंडाळीमुळे राजकारणात मोठी उलथापालथ घडत आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभेच्या रिक्त जागेकरीता पोट निवडणूक जाहिर झाली. मात्र या निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संभावित उमेदवार ऋुतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी मुंबई महारपालिकेतील नोकरीचा राजीनामा देऊनही त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर न करण्यात …

Read More »