Breaking News

आदित्य ठाकरेंचे महापालिकेसह शिंदे गटाला आव्हान, या प्रश्नांची उत्तरे द्या सिमेंट रस्त्याच्या कंत्राटावरून विचारले थेट प्रश्न

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद मुंबई महापालिकेने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंटचे करण्याची घोषणा करत त्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची निविदा जाहिर करत त्याचे वाटपही केले. या निविदा वाटपावरून आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित करत निविदा वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. तसेच चर्चेचे खुले आव्हान दिले. मात्र त्यांच्या प्रश्नाला अद्यापही मुंबई महापालिकेसह कोणीही उत्तर दिले नसल्याने आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालिका प्रशासनाला उत्तर देण्याचे आव्हान केले.

मुंबई महानगरपालिकने मी विचारलेल्या १० प्रश्नांवर प्रतिसाद दिला, परंतु त्यामध्ये अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत.

१) व्यावहारिक आणि संभाव्य स्केल’

२) मोठा घोटाळा

३) टोळधाड ‘सेटिंग’

घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना मी आज थेट सांगू इच्छितो की, त्यांनी मला चर्चेसाठी बोलावून मी विचारलेल्या वरील ‘३’ प्रश्नांचे स्पष्टीकरण द्यावे.

मला त्यांच्याकडून हे मुद्दे समजून घ्यायला आवडतील :

(१) कंत्राटदारांनी नवीन अंदाजित किमतीनुसार बोली न लावता सुधारित SOR पेक्षा सरासरी ८% जास्त बोली का आणि कशी लावली ?

(२) आजपर्यंत GST हा स्वतंत्रपणे कधीच मोजला गेला नाही. असे असतानादेखील कंत्राटदारांना ६६% वाढीव देवके देऊन GST वेगळा का लावण्यात आला ?

३) फक्त ५ बोलीदारांनीच अर्ज कसा केला आणि त्या सर्वांना प्रत्येकी एक एक निविदा कश्या मिळाल्या? आधीच ठरविल्याप्रमाणे बोलीदारांनी बोली लावली, ही एक प्रकारची टोळधाड (कार्टेलायझेशन) नाही का?

४) मुंबई महानगरपालिकेने नमूद केल्याप्रमाणे कोणत्या नगरसेवकांनी या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे सुचविले? ऑगस्ट महिन्यात आणि आता निविदा काढल्या गेल्या तेव्हा. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने ते कार्यरत नव्हते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका नेमका कोणत्या नगरसेवकांचा उल्लेख करत आहे? तसेच निवडलेल्या ४०० किमी रस्त्यासंदर्भातील नगरसेवकांची विनंती पत्रे आम्ही पाहू.

५) राष्ट्रीय अनुभव असलेल्या या कंत्राटदारांनी मुंबईसारख्या इतर शहरात कुठे आणि कोणत्या दराने काम केले आहे? मुंबईसारख्या इतर कोणत्या शहरात सगळे कॉक्रिटचे रस्ते आहेत?

६) मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे २४ महिन्यांचा (पावसाळा वगळता) कालावधी ४०० किमी रस्त्यांच्या (काँक्रीटीकरणा) साठी लागणार आहे. प्रत्यक्षात हे काम ३२ महिन्यापर्यंत चालते. काँक्रीट क्यूरिंग टाइम आणि ट्रैफिक मॅनेजमेंटसाठी लागणाऱ्या कालावधीचा हिशोब या प्रतिसादामध्ये धरला गेला आहे का ?

ही रस्त्यांची मेगा कॉन्ट्रॅक्ट्स खोके सरकारच्या फायद्यासाठी तयार केली गेलीत का?

ते प्रसारमाध्यमांसमोर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून समजून घ्यायला मला आवडेल. वेदांता फॉक्सकॉन आणि इतर राज्यांत जाणाऱ्या उद्योगांबद्दल त्यांनी जसं मौन ठेवल, तसचं मौन ते मेगा टेंडर्स संदर्भातही ठेवत आहेत. या गोष्टीवरून असे दिसून येते की, रस्त्याच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरु असलेल्या आर्थिक, प्रशासकीय आणि नागरी गैरव्यवस्थापनांबद्दलच्या माझ्या शंकांवर ते सहमत आहेत.
मुंबईवर प्रेम करणाऱ्या इतर सर्व राजकीय पक्षांनी पुढे येऊन आपले मत मांडावे, यासाठी मी त्यांना बोलण्याचे आवाहन करत आहे.
आदित्य रश्मी उद्धव ठाकरे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार वरळी विधानसभा

Check Also

माजी गृहमंत्र्यांच्या उत्तरावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी वळसे-पाटलांवर आरोप केलाच नाही माझ्यावरील कारवाईसाठी वरून आदेश आले होते

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार होते. अडीच वर्षांचं महाविकास आघाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *