Breaking News

Tag Archives: balasaheb thorat

मुख्यमंत्र्यांचा निर्धार, कर्नाटकातील मराठी प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच राज्य सरकारकडून पहिल्यांदाच सीमाप्रश्नी जाहिर भूमिका

मुंबई : प्रतिनिधी सीमावासियांच्या पिढ्यान्-पिढ्या कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजुट करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासींच्या पाठिशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे सांगून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी टाळ्यांचा …

Read More »

दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार ! शेतकरी आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी ६१ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरु असताना देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. दिल्लीतील आजच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले ते अयोग्य असून हिंसेचे समर्थन करता येणार नाही. परंतु या …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा ढोंगीपणा का? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सवाल

भंडारा-चंद्रपूर : प्रतिनिधी काँग्रेसने बाजारसमिती रद्द करण्याचे आश्वासन का दिले? २००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का? असे प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना …

Read More »

डाव्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वतंत्र अजेंडा आझाद मैदानावर दोन्ही पक्षांचे मर्यादीत कार्यकर्त्ये हजर

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांच्या जवळपास सर्वच संघटनांनी एकत्रित येत मोर्चा काढला. या मोर्चात आदिवासी, कातकरी आणि शेतमजूरांचा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. मात्र या मोर्चाचे सारे श्रेय मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे फारसे कार्यकर्त्ये न आणता श्रेय लाटल्याचे चित्र आजच्या सर्वच घटनांवरून दिसून येत …

Read More »

सात-बारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव ! आझाद मैदानातील शेतकऱ्यांचा एल्गार देशाला दिशा देणारा ठरेल: बाळासाहेब थोरात

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला तरिही शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून तो देशाला दिशा …

Read More »

पवारांचा सवाल, देशाच्या पंतप्रधानांनी आंदोलक शेतकऱ्यांची चौकशी केली का ? संयुक्त शेतकरी मोर्चात मोदींना पवारांचा खडा सवाल

मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीच्या सीमेवर थंडी, वाऱ्याची पर्वा न करता केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेले ६० दिवस आंदोलन करत आहेत. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांची साधी चौकशी तरी केली का असा सवाल करत केंद्र सरकाला कणव नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्ष सव्वालाखेंनी स्विकारला पदभार, म्हणाल्या… ‘शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे तीन काळे कायदे’ पुस्तकाचे प्रकाशन.

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण सोहळा प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दिमाखात पार पडला. काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांना न्याय देण्याचे काम केले आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा …

Read More »

मुंबईतील शेतकरी आंदोलनात शरद पवारांसह आघाडीचे नेते राहणार उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी …

Read More »

खोटे आकडे देऊन दिशाभूल करण्यापेक्षा भाजपने पराभव मान्य करावा ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा-बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पार पडलेल्या १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने ८० टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविला आहे. या निकालातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या …

Read More »

औरंगाबाद नामांतर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले शिवसेनेला ढोंगी म्हणे शिळ्या कढीला ऊत आणला जातोय

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात औरंगाबाद नामांतराच्या प्रश्नावरून धुराळा उठत असतानाच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नामांतरचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याच्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या या भूमिकेला चक्क ढोंगीपणाची उपमा देत शिळ्या कढीला ऊत आणण्याचा …

Read More »