Breaking News

Tag Archives: balasaheb thorat

राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित होणार सर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ज्या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत त्या नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्य शासनाने ऑगस्ट २००१ मध्ये गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा मान्य करुन अस्तित्वामध्ये आणला होता. दिनांक ०१ जानेवारी, २००१ च्या पूर्वी …

Read More »

३६७ कोटी मिळाल्याचा आनंदच पण ३० हजार कोटी रू.च्या खड्यांचे काय ? महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा मंत्र्यांना प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या महसूल वाढीसाठी आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत ३६७ कोटी रूपयांचा रक्कमही मिळाली. परंतु मागील ८-९ महिन्यात पडलेल्या ३० हजार कोटी रूपयांच्या तूटीचे काय? ही तूट कशी भरून काढायची असा सवाल महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून महसूल …

Read More »

मुद्रांक शुल्क कपातीमुळे राज्याच्या तिजोरीत कोट्यावधी रूपयांची भर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही …

Read More »

शिवसेनेला विरोध करत मुंबईपाठोपाठ औरंगाबादेतही काँग्रेसचा स्वबळाचा नारा मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करण्याचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोमाने कामाला लागावे. पक्षहित हे सर्वात महत्वाचे आहे. कसल्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही.  औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा होईल यासाठी कामाला लागा, पक्ष सर्वतोपरी मदत करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा …

Read More »

उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी खुशखबर : पद भरती प्रमाण आणि सेवाज्येष्ठता निश्चित न्यायालय, मॅटच्या अनेक दट्यानंतर अखेर महसूल विभागाच्या विशेष सेलकडून धोरण जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या एकूण पद संख्या आणि पदोन्नती, थेट भरतीतून येणाऱ्यांचे प्रमाण आतापर्यत निश्चित नव्हते. मात्र न्यायालय, मॅटने अनेकवेळा आदेश दिल्यानंतर अखेर महसूल विभागाने याबाबतचे अंतिम धोरण तयार केले असून सेवाज्येष्ठता यादीही जाहीर केली. मागील अनेक वर्षे उपजिल्हाधिकाऱ्यांची पदसंख्या निश्चित करण्यात आली नव्हती. …

Read More »

काँग्रेसचा महाविकास आघाडीपासून फारकतीचा शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा स्वतंत्र निवडणूकीचा नारा देत सरकार पडले तर जबाबदारी आमची नाही

मुंबई : प्रतिनिधी एकाबाजूला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणूका आघाडी एकत्रितपणे लढवेल असे जाहीर केलेले असताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी काँग्रेस स्वतंत्र लढविणार असल्याची घोषणा केली. तर माजी आमदार नसीम खान यांनी सरकार पडले तर जबाबदारी आमची नसल्याचे सांगत महाविकास आघाडीतून फारकत घेण्याचा इशारा शिवसेनाला …

Read More »

शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी मित्र असल्याचे दाखवण्यासाठीची इव्हेंटजबाजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी इव्हेंटबाजी करत ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपये दिल्याचा मोठ्या थाटात गवगवा केला. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत एक महिन्यापासून हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. नवीन कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची मागणी आहे परंतु त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी आपण …

Read More »

शेतकऱ्यांचे ‘भारत बंद’ आंदोलन हे आता जनतेचे पाठिंबा देत काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधातील भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले. हे कायदे शेतकरी हिताचे नसून मुठभर धनदांडगे, उद्योगपती, साठेबाज यांच्या फायद्याचे असून यातून शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसानच होणार आहे. कोणतीही चर्चा न करता, खासदारांना निलंबित करुन हुकुमशाही पद्धतीने हे कायदे आणले गेले आहेत. या …

Read More »

राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काढले यांनी काढत डिसले यांच्यासारखे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे …

Read More »

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा आरपारच्या लढाईत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी- बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या …

Read More »