Breaking News

अखेर अनाथ मुलांना १ टक्के आरक्षण मिळणारच शासन निर्णय प्रसिध्द

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विविध अनाथ आश्रमात राहणाऱ्या अनाथांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जगण्यासाठी जातीपासूनच्या सर्व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुला-मुलींना शासकिय नोकऱ्यांपासून ते शासकिय लाभापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी पात्र होता येत नव्हते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथांना १ टक्के समांतर आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अनाथ मुलांना आऱक्षण देण्यासंबधीचा शासन निर्णय आज २ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला.

या निर्णयामुळे अनाथ मुलांना शिक्षण व नोकरी यामध्ये खुल्या प्रवर्गातून १ टक्का आरक्षण मिळणार आहे. बालगृह व अन्य अनाथ मुलांपैकी महिला व बाल विकासांकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र असणाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ज्याचे आई-वडील, अन्य नातेवाईक यांची कोणतीच माहिती नाही त्यांनाच या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हे आरक्षण सरकारी सेवेतील नोकऱ्यांसाठीही राहणार असून शिष्यवृत्ती, वसतिगृह, व्यावसायिक शिक्षणासाठी, शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती योजनांसाठी असणार आहे.

 

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *