Breaking News

रेशन कार्डावर आता आयोडीनयुक्त मीठ ही मिळणार अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते मुंबईत शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी
आहाराची सकसता वाढविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांमधील अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्तभाव दुकानातून शिधापत्रिकेवर ‘लोह आणि आयोडिनयुक्त’(डबल फोर्टीफाईड) मीठ वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत मुंबइ येथे या मीठ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या बुधवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते आणि उद्योग व खनिकर्म मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री, सुभाष देसाई व, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम चितपावन ब्राम्हण संघ सभागृह, श.वि. सोवनी पथ, गिरगाव, मुंबई-400004 येथे होणार आहे.
सध्या शिधापत्रिकेवर रास्त दरात गहू, तांदूळ आणि तूर डाळ देण्यात येते. सध्या दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड १ किलो प्रतिकिलो रु. २०/- या दराने साखर वाटप करण्यात येत आहे. तर, प्रति कार्ड १ किलो चणाडाळ व एक किलो उडीदडाळ किंवा दोन्ही पैकी कोणतीही एक डाळ २ किलो, प्रतिकिलो रु. ३५/- या दराने उपलब्ध होत आहे.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *