Breaking News

एम्स मध्ये पीजी करायचीय, मग आधी सीईटीच्या परिक्षेचे वेळापत्रक पाहुन घ्या शेवटची तारीख ५ ऑक्टोंबर २०२३

सध्या करिअर ओरिएंडटेड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याचा प्रकार सर्रास आढळून येतो. त्यातच नावाजलेल्या एम्स, आयआयटी आणि आयआयएम मध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून पूर्व परिक्षेसाठी जोरात प्रयत्न केले जातात. आता एम्समध्ये पीजी अर्थात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या सीईटी परिक्षेची अर्थात २०२४ च्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशासाठी परिक्षेची अर्ज भरण्याची तारीख जाहिर झाली आहे. तसेच या परिक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ५ ऑक्टोंबर ही अंतिम तारीख असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

एम्समध्ये प्रवेश मिळविण्यासंदर्भातील पूर्व परिक्षा असलेल्या सीईटी परिक्षेचे वेळापत्रक १५ सप्टेंबर रोजी जाहिर झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी aiimsexams.ac.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपला अर्ज भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना MD/MS/M.Ch, DM, MDS या ६ वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आपला अर्ज भरता येणार आहे.

या अभ्यासक्रमाच्या पूर्व परिक्षेकरिता ५ ऑक्टोंबर ही शेवटची तारीख असून आपला अर्ज योग्यरित्या भरला गेला की नाही, त्यावर लावण्यात आलेला फोटो आपलाच आहे का या सगळ्या गोष्टी ६ आणि ७ ऑक्टोंबर असे दोन दिवस विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर ८ ऑक्टोंबर रोजी अर्ज एम्सकडून संकेतस्थळामार्फत स्विकारला जाणार आहे.

त्याचबरोबर अर्जाला लागणारी आवश्यक ती कागदपत्रे संकेतस्थाळामार्फत सादर करण्यासाठी १७ आणि १८ ऑक्टोंबर असे दोन दिवस देण्यात आले आहेत. त्यानंतर संबधित विद्यार्थ्याचे परिक्षेचे प्रवेश पत्र ३० ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. तर सीईटची परिक्षा ५ नोव्हेंबर २०२३ रोजी एम्सकडून घेण्यात येणार आहे.

पूर्व परिक्षेचा अर्ज कसा भरालः-

aiimsexams.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर अॅकेडमीक कोर्सेस यावर संबधित विद्यार्थ्याने क्लिक करायचे. त्यातून काँम्प्युटरवर दुसरा विंडो ओपन होईल.

AIIMS INI CET January 2024 असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आणि स्वतःचा अर्ज भरायचा.

अर्ज भरून झाल्यानंतर ऑनलाईन स्वरूपात परिक्षा फी भरायची.

त्यानंतर संबधित अर्जाची प्रिंट ऑऊट काढून ठेवायची.

परिक्षेच्या निकालानंतर उतीर्ण विद्यार्थ्यांना एम्सच्या नवी दिल्ली आणि इतर ठिकाणी JIPMER पॉडिचेरी, एनआयएमएचएएनएस बेंगलूरू, पीजीआयएमईआर चंदिगढ आणि एससीटीआयएमएसटी त्रिंवेंद्रम या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे.

Check Also

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *