Breaking News

अमित शाहंच्या टीकेवर उध्दव ठाकरेंचा पलटवार, मोगँबोने मिठाचा खडा टाकला आम्ही आता… निवडणूक निकालावरून अमित शाह यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा पलटवार

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणीची याचिका प्रलंबित असतानाच केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण प्रकरणी निकाल देत एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहिर केला. यापार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी आयोगाच्या निकालाचा संदर्भ देत काल निवडणूक आयोगाने आपल्या निकालाच्या माध्यमातून दूध का दूध पानी का पानी केले असे सांगत धोकेबाजांना सोडायचे नसते अशी टीका केली. अमित शाह यांच्या या टीकेवर पलटवार करताना उध्दव ठाकरे यांनी अमित शाहला मोगँबा अशी उपमा देत म्हणाले, कालच्या निकालाने दूध का दूध वेगळे केले नाही तर तुम्ही दूधात मिठाचा खडा टाकलात. मात्र आता आम्ही दुधात साखर टाकणार असल्याचे सूचक वक्तव्य करत पलटवार केला. तसेच त्या दूधात साखर घालण्यासाठीच आज आम्ही एकत्र येत असल्याचेही स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी कालच जाहीर केले. तसेच आगामी महापालिका निवडणूकीत भाजपा-शिंदे गटाला पराभूत करण्याच्या अनुषंगाने उत्तर भारतीय समाजाच्या नेत्यांशी अंधेरी येथे संवाद साधला.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, आपण हिंदू म्हणून एरवीही एकत्र असतो. मात्र निवडणूका आल्या की आम्ही मराठी तुम्ही उत्तर भारतीय असे का बनतो, असा सवाल करत गेली अनेक वर्षे आपण हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे यापुढेही आपण हिंदू आणि मुंबईकर म्हणून एकत्रच पुढे जाऊ असे आवाहनही केले. आम्ही भाजपाला सोडलेय हिंदूत्व सोडलेले नाही. आमचे हिंदूत्व हे द्वेष करणारे, विद्वेष पसरविणारे नसल्याचेही स्पष्ट केले.

यावेळी भाजपावर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, १९९३ च्या दंगलीत मुंबई वाचविण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला. त्यांनाच आज तुम्ही गुन्हेगार ठरविता. आज जे सध्या सुरु आहे ते तुम्हाला तरी पटतय का असा सवाल करत तुम्ही त्यांना जिथे बसवलय तिथे ते बलवान झालेत मात्र देश कमकुवत झालाय. मी हे फक्त मुंबई महाराष्ट्रासाठी करत नाही तर देश वाचायला हवा असे स्पष्ट करत आज माझ्या हातात एक माईक सोडला तर तुम्हाला द्यायला काहीच नाही असेही सांगायलाही विसरले नाहीत.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, आता हिंदू मतदार जागा झाला आहे भाजपाकडून धुळफेक करण्यात येत आहे. कधी हिजाबच्या प्रश्नावरून तर अजून कोणत्या तरी कारणावरून वातावरण तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. तुमची सत्ता असताना हिंदूंना जनआक्रोश मोर्चा का काढावा लागतोय असा खोचक सवाल करत ते म्हणाले, मुस्लिम-उत्तर भारतीयांसोबत आमचे भांडण नाही. जोवर तुम्ही सर्वजण आपला देश मातृभूमी मानता तो पर्यंत आपण सर्वजण भाऊ आहोत. काश्मीरमध्ये सैन्यातील औरंगजेबाची अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्याने देशासाठी जीव दिला तो आमचा भाऊ अशी भूमिकाही स्पष्ट केली.

Check Also

झारखंडमध्ये मंत्री सचिवाच्या नोकराच्या घरून सापडली बेहिशोबी रोकड

ईडी अर्थात सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने ६ एप्रिल रोजी झारखंडच्या एका मंत्र्याच्या सचिवाशी कथितरित्या संबंधित असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *