Breaking News

अखेर मुघलांचा इतिहास NCERT च्या अभ्यासक्रमातून बाहेर? भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी ट्विटद्वारे केला दावा

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४ तासांच्या आता NCERT अर्थात नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रीसर्च अँड ट्रेनिंगनं आपल्या १२वीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास सांगणारे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं भाजपानंही स्वागत केलं आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी यासंदर्भात इंडिया टुडेच्या वृत्ताचा एक व्हिडीओ ट्वीट करून त्यावर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. एनसीईआरटीनं मुघलांचा खोटा इतिहास हटवण्याचा एक चांगला निर्णय घेतला आहे. चोर, पाकिटमार आणि क्षुल्लक सडकछाप लोकांना मुगल साम्राज्य आणि भारताचे बादशाह म्हटलं जायचं. अकबर, बाबर, शाहजहान, औरंगजेब यासारख्या लबाड लोकांची जागा इतिहासाच्या पुस्तकात नाही, तर कचरापेटीत आहे, असं कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

बारावीच्या पुस्तकातून इतिहास हटवल्यानंतर आता पुढे काय? यासंदर्भात कपिल मिश्रा यांनी अजून एक ट्वीट मंगळवारी केलं आहे. यामध्ये मुघलांचं असत्य इतिहासातून हटवण्यात येत आहे. आता पुढच्या टप्प्यात त्यांचं सत्य सांगितलं जाईल. मुघलांची लूट, व्याभिचार, अत्याचार, घाबरटपणा, मंदिर-मूर्तींचा द्वेष, आपल्याच मुलींशी त्यांचे असणारे नातेसंबंध, त्यांची नशेच्या आहारी गेलेली मुलं, कला-साहित्य-संगीताशी त्यांचं असलेलं शत्रुत्व अशा सर्व गोष्टींबाबतचं सत्य उघड होईल”, असं कपिल मिश्रांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

एनसीईआरटीकडून वगळण्यात आलेल्या भागामध्ये १६व्या आणि १७व्या शतकातील मुघल साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश आहे. ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्टरी पार्ट टू’ या पुस्तकातील हा भाग वगळण्यात आला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *