Breaking News

संजय राऊत यांची मागणी अर्धमान्य करत ईडीने बजावले नवे समन्स २७ तारखेला चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश

सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर २० तारखेला ईडी चौकशीसाठी येता नसल्याचे कारण देत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ७ ऑगस्ट नंतरची तारीख देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र ईडीने संजय राऊत यांची मागणी अर्धमान्य करत ईडीने त्यांना सुधारीत तारीख दिली मात्र ७ ऑगस्टनंतरची तारीख देण्याऐवजी त्यांना याच महिन्यातील २७ जुलैची तारीख देत या दिवशी चौकशीसाठी बोलाविले.

गोरेगाव पत्रा चाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ही नोटीस बजाविली आहे. यापूर्वी राऊत यांच्या पत्नीची आणि त्यांचीही चौकशी ईडीने केली होती. त्यानंतर संजय राऊत यांचे दादर येथील घर ईडीकडून जप्त करण्यात आले.

राऊत यांना ईडीने समन्स पाठवून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण कामानिमित्त दिल्लीत असल्यामुळे राऊत ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. अखेर त्यांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. पण ईडीने त्यांची मागणी फेटाळली असून बुधवारी ईडीने त्यांना नवीन समन्स दिले आहे. त्यात त्यांना २७ जुलैला ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधीत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान व इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने २००६ मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला; परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून विकासकाने म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात २०११ मध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली.

म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करत आहे. एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ही रक्कम नंतर प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली. गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये २०१० मध्ये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. दरम्यान, सध्या दिल्लीत असल्यामुळे ते ईडीच्या दिल्ली कार्यालयात जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राऊत यांची यापूर्वीही पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने चौकशी केली होती.

Check Also

नाना पटोले यांची टीका, नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा, १० वर्ष केवळ जगभर भटंकती…

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *