Breaking News

राहुल गांधी यांचा पलटवार,… तो तर माझ्या फोन मध्ये, चर्चा मात्र माध्यमांमध्ये

संसद सुरक्षा भंग प्रश्नी काल मंगळवारी लोकसभेतील विरोधकांच्या ४९ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. त्यावेळचे आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतानाचा दुसरा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावरून भाजपा आणि राज्यसभेचे उपराष्ट्रपती तथा पदसिध्द सभापती जगदीप धनगड यांनी दुःख व्यक्त केले. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांना विचारले असता करण्यात येत असलेल्या आरोपावर चांगलाच पलटवार केला.

काल राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधकांच्या ४९ खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर इंडिया आघाडीतील निलंबित खासदारांनी संसदेतच आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंधोपाध्याय यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांची मिमिक्री करत होते. तर इतर सहयोगी खासदार त्यावर हसून दाद देत होते. तसेच त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे ते सर्व आंदोलन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. त्याचवेळी राहुल गांधी यांनी शुट करत असलेला व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सगळीकडे व्हायरल केला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांनी त्या मिमिक्री प्रकरणी राहुल गांधी यांचे नाव घेत तीव्र भावना व्यक्त केल्या.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांना प्रश्न उपस्थित केला असता ते म्हणाले, त्या व्हिडिओवरून जी काही सध्या चर्चा सुरु आहे. तो व्हिडिओ अद्याप माझ्या फोन मध्येच आहे. तो कोणालाही शेअर केला नाही. मात्र मी रेकॉर्ड करत असतानाचा व्हिडिओ दुसऱ्यांनी काढून तो व्हायरल केला गेला. परंतु त्या व्हिडिओचीच चर्चाच जास्त होत आहे असे स्पष्ट केले.

तसेच राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, खासदार निलंबनाची चर्चा होत नाही, संसदेत राफेल विमान प्रकरणी चर्चा होत नाही, फ्रांसकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे त्यांना या प्रकरणी चौकशी करू दिली जात नाही, अदानीच्या गैरव्यवहार चर्चा होत नाही, वाढती महागाई आणि बेरोजगारी प्रश्नी माध्यमांमध्ये चर्चा होत नाही. फक्त मी रेकॉर्ड करत असलेल्या व्हिडिओचीच चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे असा पलटवार केला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *