Breaking News

एक्झीट पोल काहीही म्हणोत आम्हीच सर्व जागा जिंकणार अँड.प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास

अकोलाः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला उद्या मतमोजणी होत असून तत्पूर्वी जाहीर झालेले एक्झीट पोल काहीही म्हणोत वंचित आघाडी महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकू शकते असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी एक्झिट पोलवर भाष्य करणं टाळलं. ज्यांना एक्झिट पोल द्यायचे होते त्यांनी दिले आहेत. ते आकडे खरे की खोटे निकालानंतर स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितले.
२३ तारखेपर्यंत सर्वांनी थांबलं पाहिजे. याआधी अकोल्यात बोलताना मतदानोत्तर चाचणीमध्ये काहीही दाखवत असले, तरी २३ तारखेचा निकाल आपल्याच बाजूने असल्याचा दावा करत २०१४ हा काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा उच्चांक होता. याबद्दल दुमत नाही. सामान्य माणसांमध्ये काँग्रेसबद्दल चीड होती. त्यामुळेच भाजपाने ४२ जागा जिंकल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ईव्हीएम हॅक केले जात असल्याच्या विरोधकांच्या दाव्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, ईव्हीएम हॅकिंगची शक्यता नाकारता येत नाही. ईव्हीएम हॅकिंग करणं कठीण नाही. कोणतंही इलेक्ट्रॉनिक आयटम हॅक होऊ शकतं. हॅक कसं होतं हे फक्त शिकलं पाहिजे. असं कोणतंही यंत्र नाही जे हँकिग होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.
विजय आपलाच -आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमातून कार्यकर्त्यांना धीर देणारा संदेश दिला आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचे दाखवण्यात येत आहे. शिवाय स्वत: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अकोला व सोलापूरमधून विजयी होऊ शकणार नाही, असा अंदाज मतदानोत्तर चाचणीत वर्तवण्यात आला. या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर संदेशात म्हणतात की, ‘मतदानोत्तर चाचणीमध्ये निकाल काहीही दाखवत असले, तरी २३ तारखेचा निकाल आपल्याच बाजूने असेल.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *