Breaking News

राजकारण

परिवहन मंत्री परब यांची घोषणा, एसटी महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु ११ हजार कर्मचारी कंत्राटीवर घेणार

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी देण्यात आलेली मुदत आज संपत आल्याच्या पार्श्नभूमीवर जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर उद्यापासून बडतर्फी, सेवा समाप्ती आणि निलंबनाच्या कारवाईला धडक सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आज संध्याकाळ किंवा …

Read More »

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “सर्व निर्बंध मागे, पण मास्क घाला..” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आवाहन

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ …

Read More »

न्यायालयांनो, आता तुम्हीच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर रोखण्यासाठी पुढाकार घ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाला आवाहन

ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा व केंद्र सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. केंद्र सरकारची ही अघोषीत आणीबाणीच असून लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व केंद्रीय तपास यंत्रणांचा वाढता गैरवापर थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने आता स्वतः हस्तक्षेप करावा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

भाजपाच्या कोअर बैठकीत झाला निर्णय, मुंबईत शिवसेनेविरोधात “पोलखोल” स्थानिक निवडणुकांसाठी भाजपाची महाराष्ट्र पिंजून काढणार

देशातील पाच राज्यात मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्र भाजपामध्ये हत्तीचे बळ आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत काहीही करून विजय मिळवायचाच या उद्देशाने १५ ते ३० एप्रिल दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची माहिती भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी देत मुंबईत मात्र प्रत्येक वार्डात पोलखोल अभियान राबविणार …

Read More »

केंद्रापाठोपाठ राज्याचीही सरकारी कर्मचाऱ्यांना गुढी पाडवा भेटः महागाई भत्त्यात वाढ केंद्राप्रमाणे राज्यातही ३ टक्के वाढ

अवघ्या काही दिवसांवर नव हिंदू वर्ष सुरु होणार असून या नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेत ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, गुढी पाडव्याला मुख्यमंत्री घेणार “तो” निर्णय निर्बंध आणि मास्क मुक्तीबाबतचा निर्णय गुढी पाढव्याच्या दिवशी

मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने राज्यातील जनता निर्बंधात रहात आहे. मात्र मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात मास्क मुक्ती आणि निर्बंध मुक्तीचा निर्णय होणार का याबाबत राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहीलेले असताना या विषयी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण विधान करत …

Read More »

नाना पटोलेंनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र पाठवित करून दिली “या” गोष्टीची आठवण किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची केली मागणी

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या (CMP) आधारे हे सरकार चालवण्याचे ठरले होते. कोरोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ, पाडव्याच्या मुहुर्तावर मोदीं सरकारचा निर्णय डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गजन्य आजारपणामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. तसेच आर्थिक आघाडीवरही राज्यांबरोबर केंद्राची परिस्थिती बिकट होती. मात्र आता कोविडचा प्रभाव ओसरल्याने आणि आर्थिक गाडी रूळावर येवू लागल्याने गुढी पाढव्याचा मुहुर्त साधत मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डिए अर्थात महागाई भत्यात वाढ …

Read More »

पाटील म्हणाले, शरद पवारांना द्यायचं की नाही तो त्यांचा प्रश्न, पण जिंकणार मोदीच विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी करू दे

युपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. परंतु भाजपाविरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात ते …

Read More »

शरद पवारांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला युपीएबाबतचा “हा” ठराव युपीएच्या अध्यक्ष पदी शरद पवारांची निवड करा

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसतंर्गत अध्यक्ष पदावरून राजकिय घमासान सुरु झालेले असतानाच युपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत एक ठराव करण्यात आला. त्यावर अद्याप शरद पवार यांची प्रतिक्रिया अद्याप …

Read More »