Breaking News

राजकारण

काँग्रेसचा सवाल, महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ? १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला ? बाळासाहेब थोरात

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने …

Read More »

नाना पटोले यांचा सवालः डोळे काढू, मुंबईत चालणे-बोलणे महाग, अशा धमक्या देणाऱ्यांना कोणाचा आशिर्वाद ? खुलेआम धमकी देणाऱ्या सत्ताधारी खासदार-आमदारांना चाप लावा

राज्यात सत्ताबद्दल होऊन भाजपाची सत्ता येताच खुलेआम धमक्या देण्याचे प्रकार वाढले असून कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी ही चिंतेची व गंभीर बाब आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदार व आमदारच डोळे काढण्याची, हायपाय तोडण्याची भाषा करत आहेत. राज्य सरकारने अशा सत्ताधारी गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, पुन्हा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील का?...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. गुजरातची निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त असल्याचे दिसत असून महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा …

Read More »

वेदांतावरून आदित्य ठाकरे म्हणाले, स्वतःसाठी खोके अन महाराष्ट्राला धोके महाराष्ट्रातून गेली गुजरातला जाण्यावरून साधला शिंदे सरकारवर निशाणा

मागील दिड वर्षापासून महाराष्ट्रात फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प सुरु करण्याच्या अनुषंगाने सातत्याने राज्य सरकारकडून चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र आज अखेर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलविण्यात आल्याची माहिती वेदांता ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनीच ट्विटवरून दिली. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत खोचक शब्दात टीका केली. यावेळी बोलताना शिवसेना …

Read More »

मुनगंटीवार यांची घोषणा, जैवविविधतेत संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना शिष्यवृत्ती देणार

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानमार्फत जैवविविधता विषयात संशोधन करणाऱ्या ७५ मुलांना जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी येत्या तीन वर्षात शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कांदळवन क्षेत्रात ७ हजार ५०० नवीन रोजगार निर्माण करण्यात येणार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, ठाणे तालुक्यातील ‘या’ १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, होय मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हस्तक पैठण येथील सभेत विरोधकांबरोबर शिवसेनेवरही सोडले टीकास्त्र

औरंगाबादेतील पैठण येथील जाहिर सभेला गर्दी व्हावी म्हणून महिला व बाल विभाग विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकावरून आणि त्यातच सभेला येणाऱ्यांना प्रति माणशी २५० रूपये देण्याच्या एक ऑडिओ क्लिपमुळे वादात सापडलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आज झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे, शिवसेना आदी विरोधकांवर निशाणा …

Read More »

दिल्लीतील नाट्यावर अजित पवार म्हणाले,… त्यामुळे मी बोलणं टाळलं गर्दी जमवण्यासाठी ही वेळ मुख्यमंत्र्यांवर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे...

पैठण येथील सभेला गर्दी जमवण्याकरीता अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, पर्यवेक्षिकांना उपस्थित राहण्याचे पत्र काढावे लागते ही वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला येण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीसेविका, मदतनीस …

Read More »

अजित पवार यांनी दिला इशारा, …तर दुध उत्पादनाचा प्रश्न गंभीर पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी ;पशुधनाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये...

देशातील राजस्थान, पंजाब, हरयाणासारख्या राज्यानंतर महाराष्ट्रातील पशुधनालाही विषाणूजन्य लंपी त्वचारोगाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यातल्या ५९ तालुक्यात हजारो जनावरे लंपी आजाराने ग्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पशुधनांमधील लंपीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दुधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लंपीग्रस्त …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ‘सेवा पंधरवडा’ नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधत या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली …

Read More »