Breaking News

राजकारण

अंबादास दानवे यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहिल्यास दिड हजार रूपये… जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. मुंबईत …

Read More »

सरन्यायाधीश लळीत यांच्या सत्कारावरून जयंत पाटील यांनी टोचले मुख्यमंत्र्यांचे कान सरकार वैधतेची गंभीर सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीशांसोबत बसणे संकेतांना धरुन नाही

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले यु.यु.लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुरुवातीला राजभवनावर होणारा सत्कार सोहळा ऐनवेळी ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला. मात्र या सत्कार सोहळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि न्यायपालिकेच्या या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राच्या सुपुत्रांची नियुक्ती झाली. मात्र ते निवृत्त होण्यापूर्वी कोणाचा राज्य …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन, नागरिकांनो तक्रारी अर्ज मुख्यमंत्री कार्यालयात सादर करा ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करा

ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामांसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये. स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून क्षेत्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज अधिक गतिमान करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनी देखील आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावे, असे आवाहन …

Read More »

शरद पवार म्हणाले, .. त्यामुळेच मोदी सरकारला कायदे मागे घ्यावे लागले रविवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन

देशात सर्वाधिक शेतकरी आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन बसतात, १ वर्षे आंदोलन करतात, ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांनीच याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चाही केली नाही. भारत सरकारने देशाच्या संसदेत तीन कायदे मंजूर केले, हे कायदे शेतकऱ्यांविषयी होते, शेतीविषयी होते. …

Read More »

अरविंद सावंत यांचा सवाल, आता यांना पान्हा फुटला, मृतदेह देताना कुठे गेला होता? देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीला सुशोभित केल्याचं समोर आलं होते. त्यावरून भाजपाचे नेते सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. त्याला आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याकूबची शवयात्रा काढून का दिली, असा सवाल …

Read More »

नितीन गडकरी म्हणाले, सरकार-बिरकारवर जास्त विश्वास ठेवू नका… नागपूरात शेतकऱ्यांना दिला सल्ला

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन …

Read More »

राज्यपाल कोश्यारी आणि शिंदे सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल शिंदे सरकारच्या निर्णयाची तपासणी करा आणि राज्यपालांच्या कारभाराविषयी नियमावली करण्याची मागणी

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला उलथवून टाकत शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार भाजपाच्या पाठिंब्यावर स्थानापन्न झाले. मात्र या सरकारला कायदेशीर मान्यता आणि एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असल्याने या सरकारच्या निर्णयाची तपासणी करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करावी तसेच राज्यपालांच्या निर्णय क्षमतेसंदर्भात कालावधी निश्चित …

Read More »

नाना पटोले म्हणाले, …ही तर भाजपाची बौद्धिक दिवाळखोरीच काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'ला मिळणाऱ्या प्रतिसादाने भाजपाला भरली धडकी

देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. राहुलजींच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत असून यातूनच …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी विद्यार्थ्यासाठीचा ‘तो’ रद्द केलेला निर्णय पुन्हा लागू करा शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी योजना पूर्ववत सुरू करा

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज,विमाप्र व  इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी ही योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, …

Read More »

भाजपाच्या ‘त्या’ व्हिडिओला शिवसेनेकडून फडणवीस, राज्यपालांच्या फोटोने प्रत्युत्तर किशोरी पेडणेकरांनी दाखविले फोटो

मागील काही दिवसांपासून याकूब मेनन यांच्या कबरीवरून भाजपा-शिवसेनेत सामना रंगला असतानाच याकूब मेनन याचा नातेवाईक रौफ मेमन याच्यासोबत मुंबई महापालिकेच्या तत्कालीन महापौर तथा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर या मिटींग करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाच्या या हल्ल्याला …

Read More »