Breaking News

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, होय मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हस्तक पैठण येथील सभेत विरोधकांबरोबर शिवसेनेवरही सोडले टीकास्त्र

औरंगाबादेतील पैठण येथील जाहिर सभेला गर्दी व्हावी म्हणून महिला व बाल विभाग विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकावरून आणि त्यातच सभेला येणाऱ्यांना प्रति माणशी २५० रूपये देण्याच्या एक ऑडिओ क्लिपमुळे वादात सापडलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आज झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे, शिवसेना आदी विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले चांगलेच टीकास्त्र सोडले.

या जाहिर सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी भाजपासोबत गेलो म्हणून माझ्यावर काहीजण आरोप करतायत की मी नरेंद्र मोदी आणि अमित शाहचा हस्तक झालो म्हणून. पण १९९३ सालच्या मुंबई दंगलीतील आरोप दहशतवादी याकुब मेमन याच्या कबरीच्या सजावटीच्या मुद्यावरून काही दिवस वाद सुरु आहे. या कबरीच्या सजावटीमागे आम्ही नाही असे आता काही जण सांगत आहेत. मात्र त्या कबरीची सजावट कोणाच्या काळात झाली असा सवाल करत ते पुढे म्हणाले, एका दहशतवाद्याच्या कबरीची सजावट करणाऱ्यांचा हस्तक होण्यापेक्षा मला ज्यांनी देशाला विकासाच्या रस्त्यावर नेले अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्यांनी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविले त्या अमित शाह यांचा हस्तक म्हणून कधीही अभिमानास्पद असल्याचे जाहिर करत शिवसेनेवर निशाणा साधला.

मुंबई महापालिका निवडणूका आल्या की यांना मराठी माणूस आठवतो. मात्र त्यांनी आपल्या रोखठोक मध्ये लिहून जाहिर करावे की, मुंबईत किती मराठी टक्का राहिला, तो कोणामुळे अंबरनाथ, बदलापूरला, कल्याणला गेला असे आव्हानही त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना दिले.

यापूर्वी अजित पवार टीका करायचे आता सुप्रिया सुळेही करायला लागल्या आहेत. त्या म्हणाल्या की, अजित पवार पहाटेपासून कामाला सुरुवात करतात. त्यांना मी सांगतो की, मी सकाळी ६ वाजेपर्यंत लोकांना भेटत राहतो असे सांगत सुप्रिया सुळे यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.

राजकारणात मी एकदा शब्द दिला की तो पाळतो, तसेच मी एकदा शब्द दिला की स्वतःचंही ऐकत नाही, असेही त्यांनी सांगत म्हणाले की, मंत्री संदीपान भुमरेदेखील दिलेला शब्द पाळतात असेही त्यांनी सांगितले.
संदीपान भुमरेंनी सांगितलं की, मी राजकारणात दिलेला शब्द पाळतो म्हणून एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला. मला बाळासाहेबांनी, आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली, ती म्हणजे जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही असेही ते म्हणाले.

संदीपान भुमरेदेखील तसेच आहेत. एकदा ते माझ्याकडे आले, कधी आले ते मी सांगत नाही. शहाजीबापू म्हणाले आम्ही सगळे एकनाथ शिंदेंकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला नेलं नाही, तर आम्हीच त्यांना नेलं. ही वस्तूस्थिती आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मला तेव्हा वाटलेलं की संदीपान भुमरे जसं बोलतात तसं धाडस करतील का, पण मी पाहिलं जबरदस्त धाडसी माणूस निघाला. दिलेला शब्द पाळणारा माणूस निघाला. लढाई तशी सोपी नव्हती. तुम्ही सगळे टीव्ही चॅनलवर बघत होता. काय होईल, काय होईल, काय होईल? अशी स्थिती होती. सगळेजण आपला कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते. सगळ्यांनीच आपला कार्यक्रम करायचं ठरवलं होतं, परंतु माझ्याबरोबर असणारे ५० लोक त्यांना पुरून उरले असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *