Breaking News

राजकारण

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्याकडून बंदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमत्री एम.के स्टॅलीन यांच्याकडून आदेश जारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यात वादग्रस्त ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा चित्रपट चालू असलेल्या स्क्रीनवरून काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले. द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी, राज्यात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. ‘द …

Read More »

शरद पवार यांची टीका, मणिपूर सारखे राज्य सांभाळता येत नाही अन कर्नाटकात… कर्नाटकमधील ४० टक्क्याचे धोरण देशात राबविण्याचा काही जणांचा विचार

कर्नाटक निवडणुकीत निपाणी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहून इथल्या जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज देशात वेगळे चित्र आहे. निवडणूक कर्नाटकमधील आहे, परंतु संपूर्ण देशाचे चित्र पाहिले तर नवनवीन समस्या दिसत आहेत. देशाच्या सीमेवरील राज्यात शांतता असणे गरजेचे आहे. मणिपूर येथे …

Read More »

पवारांपाठोपाठ आता नाना पटोले यांची स्पष्टोक्ती,… जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाचीच; जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आणखी वाढेल

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा …

Read More »

नितेश राणे यांच्या त्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचे खोचक उत्तर, आज हास्यदिन… संजय राऊत हे १० जून पूर्वी राष्ट्रवादीत जाणार असल्याचा राणेंचा दावा

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत हे १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या असून बोलणीही सुरु आहे, असा दावा आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला. नितेश राणे याच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

अन्, छगन भुजबळ यांनी आठवण करून दिली राज ठाकरेंना पुण्यातील ‘त्या’ मुलाखतीची पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी ६ मे रोजी रत्नागिरीत सभा पार पाडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. शरद पवार यांच्या तोंडून कधीही शिवरायांचं नाव येत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते …

Read More »

राज ठाकरेंच्या मिमिक्रीवर अजित पवार यांनी उडविली खिल्ली, हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार…. आमचे कल्याणचे एक सहकारी निवडूण आल्याने त्यांची पाटी लागली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतल्या सभेत शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत असताना अजित पवारांवर टीका केली. तसेच त्यांची मिमिक्रीही केली. याबाबत आज अजित पवारांना यासंदर्भात विचारला असता अजित पवार यांनी राज ठाकरेंनी मिमिक्रीशिवाय दुसरे काय जमते, मिमिक्री हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार असल्याचे सांगत खिल्ली उडविली. पुढे बोलताना अजित …

Read More »

“मॅडम सोनिया गांधीजी आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही…”, असे म्हणत ओवैसींचा संताप आरएसएसचे उमेदवार जगदिश शेट्टार यांच्या प्रचाराचावरून व्यक्त केला संताप

भाजपामध्ये योग्य पध्दतीने सन्मान दिला गेला नसल्याच्या कारणावरून कर्नाटकातील एकेकाळचे वजनदार नेते जगदीश शेट्टर यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसचा हात हाती धरला. त्यानंतर काँग्रेसने जगदीश शेट्टर यांना त्यांच्या परंपरागत हुबळी-धारवाड या मतदार संघातून उमेदारी जाहिर केली. त्यानंतर काँग्रेस नेत्या तथा माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज जगदीश शेट्टार यांच्या …

Read More »

कर्नाटकात पुन्हा भाजपा….? शरद पवार यांनी केले निकालाचे भाकित काँग्रेस बाजी मारेल असा अंदाज

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकात थळ ठोकलेला आहे. त्यातच भाजपाच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयाची माळ घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेते कर्नाटकात तळ ठोकून बसले आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे …

Read More »

संजय राऊत यांची टीका, मुख्यमंत्र्यांनी भाजपा उमेदवारांना खोके पाठवून….. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेतून हकालपट्टी केली असती

सध्या कर्नाटकातील विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असून विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराची राळ उठविली जात आहेत. महाराष्ट्रातूनही काँग्रेस आणि भाजपाचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून आहेत. तसेच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कर्नाटक दौऱ्यावरून संजय राऊतांनी …

Read More »

विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. …

Read More »