Breaking News

भाजपा कार्यकर्त्यांने केलेल्या मारहाणीवरून रोहित पवार- चंद्रकांत पाटील यांचे ट्विटर वॉर रोहित पवारांच्या ट्विटला पाटीलांचा टोला

काल पुणे येथील पुस्तक प्रकाशनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी महागाईच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढताना भाजपा कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटर वॉर सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टॅग करत, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे असे ट्विट केले.
तसेच गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे असल्याचे सांगत भाजपावर निशाणा साधला.
त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांच्या तीन ट्विटपैकी शेवटच्या म्हणजेच त्यांना टॅग करण्यात आलेल्या ट्विटला कोट करुन त्यावर रिप्लाय दिलाय. “रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्ष कार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवारांनीच ही संस्कृती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच ‘हात’ आहे? असा खोचक सवाल विचारला. या ट्विटमध्ये ‘हात’ शब्द कोट करुन पाटील यांनी अप्रत्यक्षपणे हात ही निवडणूकीची निशाणी असणाऱ्या काँग्रेसला चिमटा काढलाय.
त्याचबरोबर भाजपाने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी असेही ट्विटही रोहित पवारांनी केले.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या ट्विटला पुन्हा रोहित पवार यांनी टॅग करत पलटवार केला. रोहित पवार हे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, चंद्रकांत दादा मूळ विषय होता महागाईवरील निवेदन स्वीकारण्याचा.. पण नेहमीप्रमाणे तो भरकटवण्यासाठी तुमच्या पुरुष कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलण्याचं किळसवाणं कृत्य केलं आणि त्याविरोधात मग चिडलेल्या महिलांनी महिषासुरमर्दिनीचं रूप घेतल्यावर आता आपण अंडं.. अंडं म्हणून कांगावा करतो
काल कार्यक्रमादरम्यान काय घडले…
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मंत्री स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांच्यावर हात उचलला. सदरची घटना घडत असताना काही वृत्तवाहीनीन्यांनी ती घटना प्रसारीतही केली. याप्रकऱणी भाजपाच्या संबंधित कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी बाल्कनीमधून ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, या मारहाण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीकडून सोमवारी डेक्कन पोलीस स्थानकामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल घेत डेक्कन पोलिसांनी भस्मराज तीकोने ( रा.कसबा पेठ ) , प्रमोद कोंढरे ( रा. नातू बाग), मयूर गांधी (शुक्रवार पेठ,) या भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखला केला आहे.

 

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *