Breaking News

भाजपच्या कोट्यातील महामंडळावरील सदस्यांची यादी जाहीर ८ महामंडळावरील सदस्यांच्या नावाची यादी प्रसिध्द

मुंबईः प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या महामंडळावरील सदस्यांची नियुक्ती लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी ९ महामंडळावरील सदस्यांची यादी भाजपकडून जाहीर करण्यात आली. राज्य सरकारच्या विविध महामंडळांवरील शिवसेनेच्या कोट्यातील सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भाजपच्या कोट्यातील सदस्यांची यादी आज जाहीर करण्यात आली.
राज्य अपंग वित्त व विकास महामंडळावर जयसिंग चौहान, पवन जाधव, सुर्यकांत लाडे, संजय मैद, हिंदूराव जाधव, अँड.कांतीलाल सगोई, अश्विनी बोरीकर-कराडे यांची नियुक्ती करण्यात आली.
महिला आर्थिक विकास महामंडळावर दर्शना महाडीक, रंजना कुलकर्णी, वीणा तेलंग, अनुश्री मळगारकर, शलाका साळवी, रितू तावडे यांची नियुक्ती करण्यात आली.
वसंतराव नाईक विमुक्त जाती-जमाती विकास महामंडळावर योगेश बन, अमरसिंह भोसले, बी.डी.चव्हाण, सचिन नाईक-जाधव, डॉ.श्याम जाधव, सुरेश राठोड, बाबुराव पवार, संतोष आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली.
राज्य खनिकर्म महामंडळावर अतुल देशकर, शेखर सावरबांधे, सुनिल शिंत्रे, संदीप दादाराव पाटील, अरूण इंगवले, अरूण दळवी यांची नियुक्ती करण्यात आली.
संत रोहीदास महामंडळावर भैय्यासाहेब बेगाने, बाबुराव माने, राजेश खाडे, मयुर कांबळे, दत्तात्रय गोतीशे, विजय गोवळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
म्हाडाच्या आरआर बोर्डावर अर्थात इमारत व दुरूस्ती पुर्नरचना मंडळावर बबन गावकर, भाऊ कोरगांवकर, सिध्दार्थ गमरे, कमलाकर दळवी, प्रसाद भिडे, मंजीन पटेल, सुर्यकांत धावले यांची नियुक्ती करण्यात आली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर वसंतराव जाधव, राजन घाग, पांडूरंग गाडे, दादासाहेब जाधव, दिनेस वानखेडे, संजय घाडगे, संभाजी पवार, जी.एस.परब, नारायण काशीद, जगन्नाथ काकडे यांची नियुक्ती करण्यात आली.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण मंडळावर संदीप वरखडे, सचिन चव्हाण, गजानन चव्हाण, सुहास आडिवरेकर, अनिल ठाकूर, विनोद शेलार, श्रीकांत पांडे, जितेंद्र राऊत यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *