Breaking News

सत्ता आणण्यासाठी भाजपने मर्यादा सोडल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

एखादा राज्यात आपली सत्ता आणण्यासाठी किती टोकाचा प्रयत्न करावा. साम दाम दंड भेदाचा वापर किती करावा. आज भाजपने मर्यादा सोडल्या आहेत अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

प्रत्येक राज्यात भाजपने आपल्या सोयीचं सूत्र वापरलं. भारतातील अनेक राज्य जास्त संख्येने निवडून आलेले पक्ष यांना डावळून भाजपने मागच्या काळात सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता या निर्णयामुळे सगळे जागे झाले आहेत आणि ते आग्रह करत आहेत. कोर्टकचेऱ्या कोण करणार.

कर्नाटक राज्यपाल आणि केंद्रातील सरकारच्या निर्णयाला कोर्टाची चपराक…

कर्नाटकच्या राज्यपालांना आणि केंद्रात बसलेल्या भाजप सरकारला ही फार मोठी चपराक आहे.१५ दिवसाने बहुमत सिध्द करायला देणं हा राज्यपालांचा निर्णय किती चुकीचा होता हे यावरुन सिध्द होते. १५ दिवस म्हणजे सर्व खरेदी करायला तुम्ही मोकळे झालात असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे २४ तासात बहुमत सिध्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मला खात्री आहे की काँग्रेस आणि जनता दल यांनी एकत्र येवून ११४ ची जी संख्या गाठलीय ते सिध्द करु शकतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटकमध्ये बहुमत सिध्द करण्यासाठी कोर्टाने दिलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ते मिडियाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.

या निमित्ताने बहुमत कुणाचंही होवो पण लोकशाहीमध्ये सर्वात मोठी संख्या असलेल्या आणि सर्वात जास्त आमदार असतानाही जर त्यांना सत्ता स्थापन करु न देणं हाच मोठा लोकशाहीचा अवमान होता. आज सरकारने, राज्यपालांनी लोकशाहीची बुज राखण्याचं टाळलं, लोकशाहीच्या मुल्यांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला परंतु देशातील कोर्टाने अजुनतरी लोकशाहीची मुल्य जपण्याचा प्रयत्न केला त्याचंही मी स्वागत करतो असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपचा मुळचा जो मतदार आहे. जो काँग्रेस आणि अन्य पक्षापेक्षा साफसुतरा पक्ष आहे तो मतदार यांच्यासोबत होता तो आता विस्कळीत झाला आहे असं मला वाटतं. कारण अशापध्दतीच्या कारवाया सत्तेत आल्यावर तुमच्यात आणि दुसऱ्या पक्षात काय फरक हे वारंवार भाजप सिध्द करु लागल्याने आज देशामध्ये भाजपच्या कृतीचा सर्वसामान्य नागरिक आज निषेध करत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

Check Also

पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *