Breaking News

राऊतांच्या आव्हानाला फडणवीसांचे प्रत्युत्तर, “सिंह कधी गिधाडाला घाबरत नाही” शिवसेना खा.संजय राऊतांच्या टीकेला फडणवीस खोचक उत्तर

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या काही लोकांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप करत एकदा जर आम्ही घरात घुसलो तर नागपूरला जाणेही मुश्किल होईल असा इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेला प्रतित्युर देत म्हणाले की, “सिंह कधी गिधाडाला घाबरत नाही” असे सांगत संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता येऊन मनोरंजन करतात असा टोलाही राऊत यांना लगावला.

सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही. ईडी काय करते, का करते हे ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता येऊन मनोरंजन करतात. यापेक्षा जास्त त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं जाऊ शकत नाही अशी खिल्ली उडवित त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी कोर्टासमोर ती मांडावी असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

संजय राऊत संपादक आहेत. त्यांना माहिती आहे की हेडलाईन कशी द्यायची. दिवसभर आपलंच नाव चर्चेत राहावं असं ते वक्तव्य करतात असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावत  मोदी सरकारने कुणावरही अन्याय केलेला नाही. मोदी सरकारमध्ये असे कधीही होत नाही, असं म्हणत ईडीवरील आरोपांचे त्यांनी यावेळी खंडणही केले.

ईडीबाबत संजय राऊत काय म्हणाले?

माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनवाल्याला ईडीवाल्यांन उचलून आणले. हे त्यांचे काम आहे का? किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने पैसे घेतले नसल्याचं सांगितलं. ती मुलगी माझ्यासमोर लहानाची मोठी झाली आहे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत…मी कसे पैसे घेणार असे त्याने सांगितले. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आले. ही काय दादागिरी आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना असल्याचे संजय राऊत म्हणाले.

सूत्रधार कोण आहेत? ईडी कार्यालयात जाऊन बेकायदेशीरणे भाजपाचे लोक बसतात, त्यांना माहिती, आदेश देतात. मी फडवणीसां आवाहन करत आहे. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं आहे असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांनाही खूप त्रास दिला जात आहे. रोज कोणीतरी उठते आणि बेवड्यासारखा बडबडतो नंतर ईडी त्याच्यावर कारवाई करते असा उपरोधिक टोला त्यांनी किरीट सोमय्या यांचे नाव न घेता लगावला. मी मागेही म्हणालो होतो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही असा इशारा देत संजय राऊतांनी यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले.

Check Also

सॅम पित्रोदा यांनी दिला काँग्रेसच्या पदाचा राजीनामा पोड कास्टमुळे टीकेचे धनी बनल्याने दिला अध्यक्ष पदाचा राजीनामा

सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले असून हा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *