Breaking News

कोर्लाईच्या दौऱ्यानंतर सोमय्या म्हणाले, रश्मी ठाकरेंना न्याय मिळवून द्यायचाय बंगले आहेत की नाहीचा वादा चिघळला

मराठी ई-बातम्या टीम

कोर्लाई गावात अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीवर १९ बंगले “होते की नव्हते”चा वाद शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी उकरून काढल्यानंतर किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांचे ते पत्र काल जारी केल्यानंतर कोर्लाई गावातील त्या जागेची पाहणी करण्यासाठी आज पोहचले. त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्याला भेट दिली. सोमय्या यांच्या दौऱ्याच्या वेळी शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांचे स्वागत करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. पोलिसांकडूनही कोर्लाई गावात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की,  मुरुड तालुक्यातील कोर्लाई गावात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवर असलेले १९ बंगले गेले कुठे गायब झाले? याची चौकशी करा अशी मागणी केली आहे. कोर्लाई ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला.

ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी बंगले होते. आता जर ते तिथे नसतील तर ही गंभीर बाब आहे. ते बंगले गेले कुठे? याची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्री खरे की रश्मी ठाकरे खऱ्या आहेत याची स्पष्टता व्हायला पाहीजे. रश्मी उध्दव ठाकरे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. पाच कोटी रुपयांची मालमत्ता त्यांना परत मिळवून द्यायची आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेला लगावला.

तसेच, भेटी दरम्यान प्रशासनाने सहकार्य केले, दोन दिवसांत आवश्यक माहीती देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे सोमय्या यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले.

दरम्यान, संजय राऊत यांच्याकडून कितीही वारेमाप आरोप झाले तरी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेनी नमूद केलेल्या १९ बंगल्यावरून शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली असून त्यास सडतोड उत्तर सध्या तरी शिवसेनेकडे असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचे आरोप म्हणजे आता “खाजवून अवधान आणलं” किंवा खाजवून खरूज आणली अशी प्रतिक्रिया दस्तुरखुद्द शिवसैनिकांमध्येच उमटू लागली आहे.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *