Breaking News

अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात, जलदगती सुनावणीसाठी सरन्यायाधीश सकारात्मक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने काल ईडीच्याच्या बाजूने निकाल देत अरविंद केजरीवाल यांची अटक वैध असल्याचे ठरविले. त्यानंतर आज लगेच अरविंद केजरीवाल यांच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंतीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांना विनंती केली. त्यावर सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनीही त्याबाबत अनुकूलता दर्शविल्याची माहिती पुढे आली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी सांगितले की, ११ एप्रिल आणि १२ एप्रिलला न्यायालयीन सुट्ट्या आहेत. याचिका आता “बहुधा” सोमवारी (१५ एप्रिल) सुनावणीसाठी सूचीबद्ध होईल अशी शक्यता व्यक्त केली.

ज्येष्ठ वकील ए.एम. केजरीवाल यांच्या बाजूने उपस्थित अभिषेक मनु सिंघवी आणि शादान फरासत यांनी मुख्य न्यायाधीशांसमोर तोंडी उल्लेख केला. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची अटक त्यांच्याकडून दडपलेल्या “अविश्वसनीय कागदपत्रांच्या” आधारे करण्यात आली आहे. मी तातडीच्या यादीसाठी ईमेल पाठवला आहे. ही मुख्यमंत्र्यांची अटक आहे, असा उल्लेखही यावेळी केला.

“त्यावर सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड म्हणाले की, मी लगेच बघेन. मी खात्री करतो की सर्व ईमेल्स पाहिल्या जातील, असे सांगत अभिषेक मनु सिंघवी यांना आश्वस्त केले.

९ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाला मुख्यमंत्र्यांच्या अटकेबाबत काहीही बेकायदेशीर आढळले नाही. न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठानास प्रथमदर्शनी असे आढळून आले की पुरेशी सामग्री आहे, ज्यामध्ये मंजूरी देणाऱ्यांची विधाने, मध्यस्थांचा सहभाग आणि गोवा निवडणुकीतील खर्चासाठी रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली होती.

अरविंद केजरीवाल यांच्या वकीलांनी युक्तिवाद केला की, सार्वत्रिक निवडणुकीच्या काही दिवस आधी, २१ मार्च रोजी त्यांना अटक करण्याचा निर्णय, भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) बाजूने एक असमान खेळाचे मैदान तयार करण्यासाठी काळजीपूर्वक ही गोष्ट तयार करण्यात आल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

तसेच त्यांची अटक आणि अबकारी धोरणाविरुद्धचा खटला हे या प्रकरणात केंद्रीय एजन्सी, सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय (ईडी) विरोधी पक्षाला संपविण्यासाठी हत्यार म्हणून दुरुपयोग केल्याचं उदाहरण आहे, असा दावाही यावेळी केला.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, ईडीने दाखल केलेल्या पाच पुरवणी तक्रारींमध्येही त्यांचे नाव फिर्यादीच्या तक्रारींमध्ये संशयित म्हणून आलेले नाही. यापूर्वी ईडीने जारी केलेले समन्स हे अस्पष्ट स्वरूपाचे होते. त्यांच्या संदिग्धतेने राजकीय मतभिन्नता मिटवण्याच्या चौकशीचा हेतू दर्शविला जात आहे. त्याचा सतत तुरुंगवास हा फेडरल गव्हर्नन्स व्यवस्थेवरील धोका असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *