Breaking News

अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी मंत्री इराणींच्या कार्यक्रमात केले आंदोलन पोलिसांनी नंतर महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेत काढले बाहेर

वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून कधीकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या स्मृती ईराणी यांना पुन्हा एकदा वाढत्या महागाईची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने सुरुवातीला त्या ज्या हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. त्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरले. मात्र बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या विरोधात घोषणाबाजी करत मंत्री स्मृती ईराणी यांना महागाईची आठवण करून दिली. परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून या कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला.

पुण्यातील सेनापती बापट रोडवर एका हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, सतत होत असलेल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षा पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या देण्यात येणार होत्या. पण त्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतले. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न करत ईराणी यांनी महागाई कमी करण्यासाठी मोदींना सांगावे असेही त्या म्हणाल्या.

‘हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद हैं ना? अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.

२०१४ पूर्वी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात स्मृती इराणी यांनी जे आंदोलन केले होते त्या आंदोलनाची आठवण करून द्यायची आहे. आज गॅस दरवाढ काय झाली आहे. त्यामुळे आमच्या महिला भगिनींना घर चालविणे मुश्किल झाले आहे. पण या महागाईवर एक महिला असलेल्या स्मृती इराणी कुठेच बोलताना दिसत नाही. ही निषेधार्थ बाब आहे. तसेच या महागाई विरोधात आज आंदोलन करत असून आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही निषेधार्थ बाब असल्याचे आंदोलनकर्त्या पूजा आनंद यांनी सांगितले.

दरम्यान पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात काही महिला कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या विरोधात घोषणाबाजी करत मंत्री ईराणी यांच्या विरोधातही घोषणा केली. यावेळई काही पुरूष कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत  असल्याचे दिसून आले.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करत असताना भाजपाचे पुरूष कार्यकर्त्ये मोदी मोदी अशा घोषणा देत त्यांच्यासमोर आले. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत पुढे निघून गेले.

 

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *