हिंदूत्वावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या डॉ अनिल बोंडेना बढती; राज्यसभेसाठी उमेदवारी भाजपाकडून यादी जाहिर

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातून पराभवाला सामोर जावे लागल्यानंतर माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्यावर भाजपाने राष्ट्रीय किसान सभेच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली.

मात्र मागील काही दिवसांपासून डॉ. अनिल बोंडे हे सातत्याने हिंदूत्वावरून आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने त्यांची दखल जवळपास सर्वच पक्षांनी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे भाजपामधील श्रेष्ठींनी त्यांच्या या कामाची दखल घेत थेट बढती देत त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली.

काही महिन्यापूर्वी त्रिपुरा येथील कथित व्हिडिओवरून मुस्लिम समुदायांनी मोर्चा काढत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली. त्याला प्रत्युतर म्हणून अमरावतीतही भाजपाने मोर्चा काढत अमरावती बंदची हाक दिली.

त्यावेळी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवर डॉ.अनिल बोंडे यांनी आक्षेप घेत पोलिसांना सुनावण्यास मागे पुढे पाहिले नाही.  त्याचबरोबर त्यांनी फेसबुकवरून हिंदूत्ववादी विचारांचा प्रसार करण्यासाठी फेसबुकवरून एक बैठक घेतल्याचे उघडकीस आले होते. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या.

डॉ.बोंडे यांच्या याच आक्रमक भूमिकेमुळे राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर दोन जण निवडून जाणार आहेत. या दोन जागांसाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि डॉ.अनिल बोंडे यांना भाजपाने उमेदवारी जाहिर केली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचे शल्य बाळगूनही भाजपाचा आक्रमक चेहरा म्हणून सातत्याने चर्चेत असलेल्या डॉ. अनिल बोंडे यांचे हे राजकीय पुनर्वसन मानले जात आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मोर्शी मतदार संघातून डॉ. बोंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पण ते स्वस्थ बसले नाहीत. जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व आंदोलनात, कार्यक्रमांमध्ये ते सक्रीय राहिले. विदर्भातून कुणबी, मराठा समाजात जनाधार मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपामध्ये सुरू झाला होता. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. बोंडे यांना ही उमेदवारी बहाल करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

डॉ. अनिल बोंडे यांनी शिवसेना पक्षातून कारकीर्द सुरू केली होती. मध्यंतरी त्यांनी स्वत:चा पक्षही काढला होता. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. डॉ. बोंडे यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चांगले संबंध राहिले आहेत. भाजपाच्या पक्षसंघटनात्मक बांधणीत डॉ. बोंडे यांचा उपयोग करून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न राहणार आहे. भाजपाच्या किसान मोर्चाचे ते राष्ट्रीय सरचिटणीस देखील आहेत.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *