ॲड प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, कर्नाटकात अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट आरक्षणावरून काँग्रेसवर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर कर्नाटकात अनुसूचित जातींच्या (SC) संदर्भात बनावट सर्वेक्षण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमांवर एक्स x (ट्विटर) राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना टॅग करत, काँग्रेसवर अनुसूचित जातींना फसवण्याचा कट रचल्याचा प्रश्न विचारला आहे. त्यांनी थेट राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांना उद्देशून विचारले की, तुम्ही अनुसूचित जातींना फसवण्याचा कट का करत आहात?

‎प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, काँग्रेस कर्नाटकात अनुसूचित जातींसाठी एक बनावट सर्वेक्षण करत आहे! निवासी लोकांशी न बोलता किंवा कोणतीही माहिती न गोळा करता, घरांवर गुप्तपणे नोटिसा चिकटवून कोणते कायदेशीर सर्वेक्षण केले जाते?
या संदर्भातील फोटो सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी पोस्ट केले आहेत.

‎प्रकाश आंबेडकर यांनी पुढे विचारले आहे की, अशा खोट्या सर्वेक्षणांचा काय उपयोग होईल?

‎प्रकाश आंबेडकर यांनी या ‘बनावट सर्वेक्षणा’ मागे काँग्रेसचा कट असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच अनुसूचित जातींचा चुकीचा आणि खोटा डेटा नोंदवून, सरकारी क्षेत्रात आणि कल्याणकारी अंदाजपत्रकात त्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा काँग्रेसचा कट आहे का? असा सवालही यावेळी केला. ‎

‎शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या आरोपांमुळे कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, काँग्रेसकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटमुळे अनुसूचित जातींच्या हितासंबंधीच्या सर्वेक्षणांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *