Breaking News

जाणीवेचा दरवाजा

बंदिस्त… कलावंत आणि सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची लघुकथा

खिडकी समोर एक  कावळा आजकाल नेहमी  ओरडतो. मी ही त्याचं  ओरडणं हल्ली  हल्ली ऐकायला लागलो. त्याला  एक  दोन  वेळा पाहिलं होतं, पण तो हल्ली  थोडा उजळ  दिसू  लागलाय. माणसं घरात बंद झाल्यापासून तो  आता डेरिंग  करून  खिडकी पाशी सहज  येऊन  बसतो. तो आता पाणी  आणि  खायला  धमकी  दिल्यासारखा मागू लागतो. …

Read More »

गुगलगुरू… ते रिकामटेकडेपण संवेदनशील कलावंत, लेखक अंकुर विठ्ठलराव वाढवे यांची नेटकऱ्यांसाठी खास कथा

रवी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता खूप वाचन करून खूप हुशार आहे’, असा समज सर्व गावकऱ्यांमध्ये पसरला होता. तो प्रत्येक गोष्टीच्या खोलात शिरून त्याचा त्याच्या मनाने अर्थ आणि सत्यता शोधून काढण्यात मग्न असायचा. गावात फार कोणाशी बोलत नसे, करण तो बाकिना त्याच्या बरोबरचा समजत नव्हता, त्याच्या या एकाकी स्वभावामुळे त्याच्या …

Read More »

थडगं…कोरोनाच्या वावटळीतलं सद्यपरिस्थितीतील हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा: लेखक-सुदेश जाधव

धन्याची दुसरी पिढी मुंबईत बिगारी कामगार म्हणून काम करणारी. धन्याचा बाप नाल्यात गुदमरून कुत्र्याच्या मौतीने मेलेला. धन्याची आय कर्करोगान मेलेली. धन्याच्या बहिणीचं अजून लग्न नाही झालं आता पत्र्याच्या खोपटात धन्याची बायको, दहा वर्षाचा मुलगा, धन्या आणि त्याची बहिण मिळून चौघेच रहातात. बायकोची तब्बेत बिघडलेली होती, त्यामुळे धन्याची बायको आज गेली …

Read More »

खालुबाजा एका सनई वाजंत्री कलाकाराची कथा-लेखक सुदेश जाधव

खाडीच्या पलीकडे खालूबाजाचा जोर जोरात आवाज येऊ लागला तसा रंग्याच्या हाताला घाम सुटू लागला. रंग्या दारात बसून खालुबाजाचा येणारा आवाज आणि झुडपातून उडणारा गुलाल जणू आपल्या तोंडावर उडतो आहे असा भास कारित कर्कश सनई ऐकत राहिला. सनई चा आवाज त्याच्या कानातून आरपार जात होता. सनई वाजवणारा जेंव्हा फरफरत वाजवायचा तेंव्हा …

Read More »

गाढवाची लात डायरेक्ट सरकारात अंकुर विठ्ठलराव वाढवे लिखित राजकिय उपहास्तमक वगनाट्य

(या वगनाट्याचा आणि सुरू असलेल्या राजकीय, शैक्षणिक परिस्थितीशी जुळवून घेवू शकता) —————————————————- (रंगमंचावर अंडेरवार, शाहीर, पंडित आणि प्रधान काही तरी चर्चा करत उभे आहेत तेवढ्यात महाराज येतात, आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही हे बघून एक दोनवेळा बळेच खोलतो तरीही कोणाचे लक्ष नाही हे बघून जोरात ओरडतो.) महाराज : अरे काय चालंल …

Read More »

शरिफन…. सआदत हसन मंटो यांच्या कथेचा संवेदनशील कलावंत अंकुर विठ्ठलराव वाढवे यांनी केलेला स्वैर अनुवाद

बाहेर चाललेल्या नरसंहारातून वाचत कासीम कसाबसा घरापर्यंत पोहचला. त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीत गोळी घुसली होती. त्यामुळे तो तडफडत होता, विव्हळत होता. घराचा दरवाजा उघडताच क्षणी त्याला त्याच्या बायकोचा मृतदेह नजरेस पडला, फातिमा…. जीवाच्या आकांताने ओरडून तिच्याजवळ गेला. उजव्या पायाच्या पोटरीत घुसलेल्या गोळीची तडप आता तो विसरला आणि सूडाने पेटून उठला, …

Read More »

जम्मू आणि काश्मीरचा स्वायततेचा दर्जा व वास्तव ३७० कलमाच्या माध्यमातून भाजपाचा जम्मू आणि काश्मीर राज्याकडे पाह्यण्याचा दृष्टीकोन

जम्मू आणि काश्मीर राज्याविषयीची चर्चा नेहमीच संपूर्ण देशभरात कधी जिहादी कारवायांमुळे, कधी दहशतवाद्यांनी लष्करी, निमलष्करी दलांवर केलेल्या हल्ल्यामुळे, तर कधी स्थानिकांकडून करण्यात येत असलेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे होत असते. याशिवाय जम्मू आणि काश्मीर राज्याचा मुद्दा पाकिस्तानने आंतरराष्ट्रीयस्तरावर उपस्थित केल्यानंतर. ७०-८० च्या दशकात जम्मू आणि काश्मीरला भारताचा मुकूट (काटेरी) आणि दुसरे स्विझरलँड …

Read More »

आंबेडकरी चळवळीतील तरुणांची बौद्धिक उदासीनता संवेदनशील कलावंत-लेखक अंकूर वाढवे यांच्या नजरेतून

सध्याच्या तरुणांची चळवळ ही गूगल ते फेसबूक अशी इथपर्यंत मर्यादीत आहे. प्रश्नाला उत्तरं भरपूर आहेत पण संदर्भ नाहीत. काही मोजकेच तरुण असे आहेत ज्यांचा आंबेडकरी चळवळीचा अभ्यास आणि प्रत्यक्ष काम सुरू असते. पण त्यांनाही ही गूगल आंबेडकरी चळवळीची तरुण डावलताना दिसतात. नुकत्याच एका भीम जयंतीच्या कार्यक्रमात गेलो होतो तेथील सर्व …

Read More »

श्लेषा आणि बॉबी संवेदनशील लेखक, कलावंत अंकूर वाढवे यांचा महिला दिनानिमित्त खास लघुकथा

गीताबाई ७० वर्षांची म्हातारी आज्जी स्वतः नववारी चापून चोपून नेसते, हातात पाटल्या, बांगड्या, कपाळावर रुपया एव्हढं कुंकू कोरून लावते, डोक्यावरचा पदर हलू देत नाही. गीताबाईचं बालपण तरुणपण परंपरा, संस्कार आणि अत्याचार झेलण्यात गेलं. आपल्या लेकाचं लग्न झालं, सुशिक्षित सून घरात आली, नवी नवरी शहरातली, काही दिवसात गीताबाईला जाणवलं सुनेला साडी …

Read More »

युध्द ! संवेदनशील लेखक, विनोदी अभिनेते अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचे खास सदर आपल्यासाठी

पुलवामाच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर निषेधाचा, विरोधाचा सूर प्रचंड मोठ्याप्रमाणात घुमू लागला, आणि तो घुमने साहजिकच आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता उन्हात, पावसात, थंडीत गाठत संरक्षणाची भींत म्हणून उभ्या असलेल्या जवानावर हा हल्ला होता. त्यामुळे हा राग स्वाभाविक आहे. संपूर्ण देशात हा राग पसरलेला असताना रवी कसा शांत बसू शकतो. …

Read More »