Breaking News

मुंबईतली वाहने म्हणणार DK : मरते दम तकची आठवण करून देणार नवी सीरीज करत असल्याची परिवहन विभागाची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात चारचाकी वाहनांसाठी DK ( डिके ) ही नवी सीरीज सुरू करण्यात येत असून डॉयलॉग किंग राजकुमार आणि स्व. अभिनेते ओमपुरी यांच्या मरते दम तक हिंदी चित्रपटातील डॉयलॉगच्या धर्तीवर ही सीरीज सुरू करण्यात येत असल्याची चर्चा परिवहन विभागात सुरु आहे.
हिंदीतील सुपर हीट चित्रपट मरते दम तक मध्ये अभिनेते राजकुमार हे चित्रपटातील त्यांचे सहअभिनेते ओमपुरी यांना डिके या नावाने संबोधित करत असतात तर ओमपुरी राजकुमार यांना राणा या नावाने संबोधित करत असतात. डिके या सीरीजमुळे वाहन मालकांना मरते दम तक या चित्रपटाची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही.
ताडदेव येथील मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात येते. सध्या चालू असलेल्या MH-01-DE ही चारचाकी संवर्गातील वाहनांकरिता असलेली मालिका संपुष्टात येत असल्याने MH-01-DK ही मालिका नियमित पद्धतीने सुरू करण्यात येत आहे. वाहनधारकांनी आपल्या पसंतीचा क्रमांक आवश्यक ते शुल्क भरून प्राप्त करावा असे आवाहन मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.
वाहनांकरिता आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या सुधारित नियम 54 (अ) यानुसार आगाऊ शुल्क भरून वाहनाचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची तरतूद आहे.
वाहनक्रमांक आरक्षित करण्याकरिता फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड, वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत. मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या खिडकी क्रमांक E-18 वर वाहनक्रमांक आरक्षित करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. तसेच आवश्यक त्या मार्गदर्शनाकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक सुदधा करण्यात आली आहे.
वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याकरिता विहित शुल्काचा धनाकर्ष प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे. आरक्षित केलेल्या वाहनक्रमांकाची वैधता ३० दिवसांकरिता असून ३० दिवसांच्या आत त्या क्रमांकावर वाहन नोंदणी होणे आवश्यक आहे.

Check Also

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *